पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरीगांव गणेशनगर एसआरए पुनर्वसन धारकांना बुधवार रोजी आमदार आण्णा बनसोडे यांच्या हस्ते चावी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी माजी स्थायी समिती सभापती-डब्बू आसवानी, मा. नगरसेवक-संदीप वाघेरे, प्रभाकर वाघेरे, दत्ता वाघेरे, गिरीजादेवी प्रविण कुदळे, निकिताताई कदम, ॲड.गोरक्ष लोखंडे, सौ.स्मिता सुरेश लोंढे, संतोष कुदळे, बाळा आप्पा वाघेरे, रंगनाथ कुदळे, हनुमंत नेवाळे, श्रीरंग शिंदे, आनंदराव कुदळे, शारदा मुंढे, राजू भालेराव यांच्यासह अनेक माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते व गणेश नगर येथील नागरिक उपस्थित होते.
यावेळी आमदार आण्णा बनसोडे म्हणाले, एसआरए पुनर्वसनचे काम हे पिंपरी चिंचवड शहरात सर्वत्र राबविण्याचे चालू आहे. तसेच अतिशय जिकिरीचे असून सुरेश लोंढे यांच्या प्रयत्नातून ते पूर्ण झाले. त्यामुळे गोर गरीब झोपडपट्टी धारकांना स्वतःची पक्की घरे मिळाली.
तसेच गोरक्ष लोखंडे यांचे ही भाषण झाले. कार्यक्रमास सिद्धार्थ पुजारी, राजेश धोत्रे, दशरथ मंजाळ, सौरव विधाटे, संतोष पवार, चरणदास वाघमारे, अंथनी जोशफ, राहूल शिरसाट, सागर संधू, शुभम खेरटकर, कपील लोंढे, राणी विधाटे, अनिता वाघमारे, सुनिता विश्वकर्मा, सीमा सावंत, आदी जण उपस्थीत होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना सुरेश लोंढे यांनी केले. आभार सिद्धाप्पा पुजारी यांनी मानले.

















