भाजपाने ओबीसी समाजाला न्याय देण्याचे काम केले : शंकर जगताप
पिंपळे गुरव येथे ओबीसी सामाजिक संमेलन उत्साहात; ओबीसी मोर्चा पदनियुक्ती पत्रांचे वाटप
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ओबीसी बांधवांसाठी केंद्र व राज्य शासनाने मोठा निधी दिला आहे. विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून बारा बलुतेदार बहुजन समाजाला पुढे आणण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. ओबीसी, पिंपरी चिंचवड, भारतीय जनता पार्टी आणि स्व्. लक्ष्मणभाऊ यांचे एक अतूट नाते आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप पक्षाने जातीची तेढ न बांधता ओबीसी समाजाला न्याय दिला आहे. नावे घेण्यासारखे असे अनेक नेते, कार्यकर्ते यांना ओबीसीमधून लाभाची पदे दिली. भाजपामध्ये खाली बसणा-यांमधून आमदार होतो, कार्यकर्ता आमदार होतो, नवीन निवडून आलेले आमदार हे मुख्यमंत्री झालेले आहेत. प्रथम राष्ट्र, मग पक्ष, नंतर स्वत: या घोषवाक्याप्रमाणे प्रत्येकाने संघटनात्मक कार्य करून मोदी सरकारच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहन भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.
पिंपरी-चिंचवड शहर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने रविवारी ओबीसी सामाजिक संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप बोलत होते. पिंपळे गुरव येथे मोठ्या उत्साहात हे संमेलन पार पडले. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते, आमदार उमा खापरे, ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष वीणा सोनवलकर, भटके-विमुक्त प्रदेश सरचिटणीस प्रमोद परदेशी, माजी महापौर माई ढोरे, अपर्णा डोके, स्थायी समिती माजी सभापती व ओबीसी मार्चा शहराध्यक्ष राजेंद्र राजापुरे, भाजपा शहर सरचिटणीस नामदेव ढाके, प्रवक्ते तथा उपाध्यक्ष राजू दुर्गे, पिंपरी विधानसभा प्रमुख अमित गोरखे, भाजपाचे प्रदेश सदस्य सदाशिव खाडे, ओबीसी मोर्चाचे सहसंपर्क प्रमुख मनोज ब्राह्मणकर, सरचिटणीस विनोद दळवी, गोरक्ष काळे, प्रदेश सदस्य गणेश वाळुंजकर, पुणे ग्रामीण उत्तर अध्यक्ष दत्तात्रय माळी, भाजपा ओबीसी मोर्चा सरचिटणीस दत्ता ढगे, खंडूदेव कठारे, अनिल राऊत, महिला ओबीसी संपर्कप्रमुख रोहिणी रासकर, भटके-विमुक्त आघाडी शहराध्यक्ष गणेश ढाकणे, सरचिटणीस सूर्यकांत गोफणे, सोनाताई गडदे, योगेश आकुलवर यासह संमेलनाला शहरातील ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्यने उपस्थित होते. प्रसंगी, ओबीसी मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना पद नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.
शंकर जगताप म्हणाले की, मावळ लोकसभा मतदार संघ भारतीय जनता पक्षाने लढावे, ही सर्व सामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी आपल्याला बूथ स्तरावर ५१ टक्के मतदानासाठी मैदानात उतरावे लागणार आहे. अस असेल तरच केंद्र आणि प्रदेश स्तरावर मावळासाठी आपला कमळाचा विचार होणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी ५१ टक्कयांची लढाई लढायची आहे. या कार्यासाठी पक्षासाठी आपण उभे राहिले तर पक्ष आपल्या पाठीशी उभा आहे.
भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी या संमेलनात देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी गेल्या दहा वर्षात ओबीसी समाजासाठी केलेल्या कार्याचा आढावा मांडला. ओबीसी समाजासाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजनांची माहिती त्यांनी दिली. तसेच ओबीसी मार्चाच्या पदाधिकाऱ्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी योजना समाज बांधवांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष राजेंद्र राजापुरे यांच्या संयोजनात कार्यक्रम पार पडला.