जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा महिला मोर्चा व ईशा नेत्रालय चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र शिबिराचे आयोजन
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक महिला दिनानिमित्त भाजपा महिला मोर्चा व ईशा नेत्रालय चिंचवड यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचा सन्मान तसेच अत्याधुनिक मशीनद्वारे व तज्ञनडॉ. द्वारे मोफत नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .
शिबिरामध्ये अत्याआधुनिक मशीन व तज्ञ डॉक्टरांच्या द्वारे डोळे तपासणी , तसेच सहभागी सर्व महिलांना विशेष भेटवस्तू देण्यात आल्या व अल्पपोहाराचेही नियोजन करण्यात आले होते . विशेष लकी ड्रॉ मार्फत प्रथम व द्वितीय बक्षीस पैठणी देण्यात आली.महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य व भाजपा शहर सचिव यांनी शिबिराचे प्रास्थाविक केले आपल्या प्रास्थाविकात डोळे तपासणी महत्व व या शिबिरातून लोकांना मिळणारे फायदे आदी मनोगत व्यक्त केले.
यांच्या हस्ते सकाळी 10 वा शिबिराचे उदघाटन करण्यात आले. सुरेश भोईर, राजेंद्र गावडे ,अश्विनी चिंचवडे ,भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे महिला मोर्चाच्या माजी अध्यक्षा उज्वला गावडे भाजपा शहर सचिव मधुकर बच्चे,ईशा हॉस्पिटलचे गणेश कांबळे, महिला मोर्चा उपाध्यक्ष दिपाली कलापुरे ,महिला मोर्चा सरचिटणीस प्रतिभा जांभुळकर, महिला मोर्चा चिटणीस पल्लवी मारकड, महिला मोर्चा चिटणीस वैशाली वाखारे ,बेटी बचाव बेटी पढाव संयोजिका सीमा चव्हाण ,महाराष्ट्र राज्य उद्योग आघाडी उपाध्यक्ष नीता कुशारे, जिल्हा कार्यकारणी सदस्य मनीषा शिंदे
आदी भाजपा व सामाजीक मान्यवरांनी शिबिरास उपस्थिती दिली.भाजपा महिला मोर्चा शहर सचिव पल्लवी पाठक यांनी यांनी शिबिराचे आयोजन केले. कार्यक्रमाला जवळपास 200 महिलांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.