ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र
पिंपरीतील भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्म स्थळी साजरा केला जागतिक महिला दिन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी जागतिक महिला दिन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून साजरा केला. यावेळी सातारा येथील भाजप प्रदेश निमंत्रित सदस्या सुवर्णा पाटील, भाजप शहराध्यक्षा रीना भणगे, भाजप जिल्हा उपाध्यक्षा निर्मला पाटील व पिंपरी चिंचवडमधील भाजप महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
महिला दिनानिमित्त उमा खापरे यांनी राजकारणाचा प्रवास उलगडला. व महिलादिनी विचार व्यक्त केले . त्या म्हणाल्या, स्त्रीमनातील काळानुकाळ झालेली घुसमट दूर करून त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली, ती पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी!,
सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आम्ही महिला शिकलो आणि घडलो. सावित्रीबाई यांचा आदर्श डोळ्यासमोर आहे. सावित्रीबाई फुले यांनी सावित्रीच्या लेकींना शिक्षण दिले घडविले त्यांना नमन करून करून आमदार उमा खापरे यांनी सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
भाजपच्या पिंपरी चिंचवड शहराच्या प्रभारी व ऍड. वर्षा डहाळे – सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा घेऊन विविध क्षेत्रात महिला प्रगती पथावर आहे.
भाजप प्रदेश निमंत्रित सदस्या सुवर्णा पाटील म्हणाल्या, प्रवाहाविरुद्ध जाऊन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि स्त्रियांना, मुलींना आत्मनिर्भरतेने जगायला शिकवले.