

आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी तर्फे या वर्षीच्या दुष्काळाचे निवारण करण्यासाठी संस्थानच्या वतीने २५ लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मुख्य मंत्री सहायता निधीमध्ये संस्थानचे योगदान म्हणून धनादेश सुपूर्द करण्यात आला. २५ डिसेंबर २०२६ रोजी मंत्रालय मुंबई येथे धनादेश देण्यात आला.
या प्रसंगी संस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ भावार्थ देखणे, विश्वस्त ॲड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ, चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, पुरुषोत्तम दादा पाटील उपस्थित होते.



















