
पुनावळे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आमदार शंकर जगताप यांच्या विकास निधीतून पुनावळे येथील श्री खंडोबा मंदिर परिसरात सभा मंडपाचे बांधकाम सुरू आहे. या सुरू असलेल्या विकासकामाची भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा सचिव श्री. नवनाथ ढवळे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली.
यावेळी श्री खंडोबा मंदिराचे विश्वस्त आणि संबंधित ठेकेदार यांच्याशी त्यांनी चर्चा केली. सभा मंडपाचे बांधकाम मजबूत, दर्जेदार आणि टिकाऊ व्हावे, यासाठी आवश्यक सूचना दिल्या. तसेच बांधकामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता काम लवकरात लवकर पूर्ण करून हा सभामंडप भाविकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
विकासकामे केवळ मंजूर होणे महत्त्वाचे नसून ती गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित वेळेत पूर्ण होणेही तितकेच आवश्यक आहे, अशी भूमिका नवनाथ ढवळे यांनी यावेळी व्यक्त केली.
जनसेवा हीच बांधिलकी आणि विकास हाच ध्यास या भूमिकेतून विकासकामांवर प्रत्यक्ष लक्ष ठेवले जात असल्याचे त्यांनी सांगितले.



















