
नेहरूंनी धर्मनिरपेक्षतेशी कधीही तडजोड केली नाही. – निश्चय साधना
नेहरू यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या वतीने व्याख्यान
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताचे शिल्पकार भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. चिंचवडगाव येथील कै. आनंदीबाई डोके सांस्कृतिक हॉल येथे शनिवारी सकाळी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या व्याख्यानमालेमध्ये ‘नेहरू काळ – भारताचे सर्वांगीण विकास पर्व’ या विषयावर श्री. निश्चय साक्षात साधना सर यांनी, तर ‘निवडणुका, नेहरू आणि न्यू मीडिया’ या विषयावर राजकीय-सामाजिक विषयांच्या अभ्यासक, लेखिका व पत्रकार सोनाली शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
जेनझी आंदोलनाने लोकांच्या मनातील व्यक्त होण्याची भिती घालवून त्यांना वाट मोकळी करुन दिली. लोकशाही वाचवण्यासाठी लोकांनी बोलतं होण्याची गरज आहे, असे सोनाली शिंदे यांनी व्यक्त केले. देशाचा अंतिम सत्ता लोकांचीच राहण्यासाठी इथल्या प्रत्येक सर्वसामान्य माणसाने प्रयत्न करणे हीच खरी नेहरूजींना आदरांजली असेल, असंही त्या म्हणाल्या.
नेहरूंनी संविधान सभेत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी देशात लोकशाही व्यवस्था आणि लोकशाहीची मूल्य स्थापित करण्यासाठी अतोनात कष्ट केले. शेतीचा, उद्योगाचा आणि शिक्षण व्यवस्थेचा पायाभूत विकास हा नेहरूंनी केला, ज्यावर आज देश निर्माण झाला आहे. जागतिक कीर्तीच्या शैक्षणिक आणि संशोधन संस्था निर्माण केल्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विविधतेने नटलेल्या या देशाला एक संघ करण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी विविधतेत एकता, सर्वांना समान स्थान, धर्मनिरपेक्षता यांच्याशी तडजोड केली नाही.
नेहरूंच्या कार्याबद्दल इतिहासाधी इमानी असलेली तथ्य तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याची आपली जबाबदारी आहे असे निश्चिय साधना म्हणाले.
नेहरूंचे विचार, लोकशाही मूल्ये आणि आधुनिक भारताच्या विकासाचा प्रवास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे असे नरेंद्र बनसोडे म्हणाले.
या प्रसंगी नितीन गवई आणि अमोल डहाळे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहिदुले, अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष शहाबुद्दीन शेख, स्वराज इंडिया अभियानचे प्रदीप पवार, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शशी बावनकर, काँग्रेस चे उपाध्यक्ष संदीप शिंदे, मंगेश चव्हाण, सुरज माने, सरचिटणीस अनिता सावळे, अनिता सोनवणे, मीरा बावनकर, नबिल मुल्ला, विल्यम साळवी, हरीश डोळस, विलास सकट, हिराचंद जाधव, सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष कुणाल भोसले, निखिल भोईर, युनूस बागवान, कृष्णा जाधव, गौरी नरसिंगे, प्रदीप शर्मा, रामकिसन माने, चिंतामणी सोंडकर, भास्कर नारखेडे, पुरुषोत्तम राऊत, नितीन गवई आणि पदाधिकारी आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.



















