
भारताचे माजी पंतप्रधान,भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने अभिवादन
प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याचे गौरवपूर्ण स्मरण
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्न पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने त्यांच्या महानगरपालिकेतील प्रतिमेस तसेच नेहरूनगर येथील पुतळ्यास उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार अमित गोरखे,विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, नगरसदस्य राहूल भोसले,नगरसेविका अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते संदीपान झोंबाडे,नेताजी शिंदे, युवराज दाखले, नितिन घोलप,बाबासाहेब राठोड,उषामाई वाघमारे यांच्यासह महानगरपालिकेचे विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभाग घेत देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले. स्वातंत्र्यानंतर देशाची लोकशाही व्यवस्था मजबूत करणे, शिक्षण, विज्ञान, उद्योग आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देणे यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आधुनिक भारताच्या उभारणीतील त्यांचे योगदान देशाच्या इतिहासात सदैव स्मरणात राहील.



















