
पिंपरी चिंचवड विहार सेवा ग्रुप, चिंचवडगाव जैन श्रावक संघ आणि जैन कॉन्फरन्स युवा साथी परिवार यांच्या वतीने सन्मानित
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील कल्याण प्रतिष्ठान मध्ये स्थानकवाशी जैन श्रावक संघ चिंचवडगाव आणि जैन कॉन्फरन्स चा युवा साथी परिवार यांच्या वतीने प पू पुष्पचुलाजी, प पू सुप्रियदर्शनाजी, आणि प पू नियमदर्शनाजी आदि साध्वींच्या सानिध्यात सन्मानपत्र देऊन भव्य सन्मान करण्यात आला.
साधू साध्वीच्या विहारांमध्ये त्यांना साथ देणे, त्यांची सुरक्षा करणे ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी विहार सेवक सांभाळीत असतात त्यांच्या या संत सेवेचा यथोचित सन्मान या दोन्ही संस्थांच्या वतीने करण्यात आला यावेळी बोलताना परमपूज्य सुप्रिय दर्शनाजी यांनी विहार सेवकांची विहार सेवा साधुसंतांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असते आणि त्यांच्या या सेवेचा सन्मान झालाच पाहिजे.असे प्रतिपादन केले. जैन कॉन्फरन्स आणि चिंचवडगाव श्री संघ यांनी यथोचित सन्मान केला. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. विहार सेवकांना त्यांच्या सेवेबद्दल त्यांचे अभिनंदन व सन्मान या कार्यक्रमासाठी जैन कॉन्फरन्स जैन भवन योजनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया, जैन श्रावक संघाचे अध्यक्ष नंदकुमार लूनावत व त्यांचे सर्व सहकारी यांनी पुढाकार घेतला कार्यक्रमासाठी चिंचवडगाव श्री संघाचे पदाधिकारी मयूर शिंगवी, माजी अध्यक्ष दिलीप नाहर,मनोज बाफना , राजेंद्र जैन ,संतोष धोका, धर्मेश कुमट ,उमेश भंडारी, धनंजय व सुनील लुंकड तसेच जैन कॉन्फरन्स चे सागर सांकला,विलासकुमार पगारिया, देवेंद्र पारख , पी एम जैन , आदी पदाधिकारी उपस्थित होते . विहार सेवक ग्रुप यांच्या वतीने संतोष लुंकड , मनिष सोनिगरा ,संजय छाजेड़, पारस लु़ंकड, दिलीप भन्साळी, आनंद मुथा, संजय कटारिया, प्रवीण गांधी, मनोज जैन, राहुल श्रीश्रीमाल, निखिल खिंवसरा,महेश संचेती आदिंनी सन्मान पत्राचा स्विकार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नंदकुमार लूनावत यांनी केले, डॉ अशोककुमार पगारिया यांनी पिंपरी चिंचवड विहार सेवा ग्रुप ची माहिती दिली व भिलवाडा येथे युवा साथी परिवाराच्या वतीने युवाचार्य प पू महेंद्र ॠषिजी म सा आदि संत सातियांच्या सान्निध्यात विहार सेवकांच्या झालेल्या सन्मान कार्यक्रमाची माहिती दिली.



















