
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समर्थ हाऊसिंग सोसायटी एफ१६ घरकुल चिखली आणि मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष वनश्री पुरस्कारप्राप्त वृक्षमित्र अरुण पवार यांच्या संयुक्तपणे घरकुल या ठिकाणी पिंपळ, आवळा, वड, चिंच, कडुलिंब, आंबा, जांभूळ, करंज आदी देशी झाडे, तसेच काही फळांच्या आणि काही ऑक्सिजन देणाऱ्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी सोसायटीचे अध्यक्ष अशोक मगर, मीना मोहिते , सुभाष लांडगे, लक्ष्मण जाधव, रंगनाथ आवारे, बिभीषण पवार, सुग्रीव पाटील, चतुरभुज चव्हाण ,सर्व सभासद आणि स्वामी महिला बचत गट व समर्थ महिला बचत गटाच्या सदस्य उपस्थित होते.
अरुण पवार यांनी घरकुल येथे केलेल्या वृक्षारोपण या स्तुत्य उपक्रमाचे रहिवाशांनी कौतुक केले. तसेच ही सर्व झाडे जगविणार असल्याचा संकल्प केला.
दरम्यान, अरुण पवार यांनी नुकतीच जांबवडे भंडारा डोंगर पायथा या भागामध्ये एक हजार झाडांचे वृक्षारोपण केले आहे आणि आत्तापर्यंत आपण हजारो झाडे लावून जोपासली आहेत. राज्यभरात पन्नास हजाराहून अधिक झाडे लावली असून, ती पाणी घालून वाढविली आहेत. जे नागरिक, संस्था वृक्षारोपण करण्यास उत्सुक आहेत, अशांना ते देशी, फळझाडे, फुलझाडांची रोपे पुरवीत आले आहेत. आजपर्यंत अनेक संस्था, नागरिकांनी या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवला आहे. नागरिकांनी ही झाडे जपली पाहिजेत, असा त्यांचा आग्रह असतो.
दुष्काळावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून ती जपली पाहिजेत. आपल्या कुटुंबात जेवढे लोक आहेत, तेवढी किमान झाडे लावायला हवीत. ‘एक व्यक्ती एक झाड’, ही संकल्पना प्रत्येक कुटुंबाला बंधनकारक करण्याचेकोरोना काळात आम्ही जिल्हाधिकारी, वन विभाग, महापालिका प्रशासनाला आवाहन केले होते. तसा पत्रव्यवहार करीत पाठपुरावा केला आहे. प्रशासनाने ही गोष्ट गांभीर्याने घेतली तर पर्यावरण सुधारण्यास मोठी मदत होईल.
– अरुण पवार, संस्थापक अध्यक्ष, मराठवाडा जनविकास संघ व छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्कारप्राप्त



















