
कोल्हापूर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची यावेळी मोठी चर्चा झाली. महायुती विरुद्ध काँग्रेसचे आमदार सतेज पाटील अशी ही निवडणूक झाली. यामध्ये सतेज पाटील यांच्या पॅनेलने मोठे यश मिळवत सत्ता मिळवली. संपूर्ण निकाल रात्री उशीरा जाहीर झाला. दरम्यान, या निकालानंतर आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. ‘गोकुळचा कारभार हा एकमुखी असावा, तो जिल्ह्यातच चालावा असे लोकांना वाटत होते. गोकुळ ही कोल्हापूरची अस्मिता असल्याचे लोकांनी निकालातून दाखवून दिले, असेही आमदार सतेज पाटील म्हणाले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, शेतकरी आणि दूध उत्पादकांना आम्ही केंद्र बिंदू मानून प्रचार केला. त्याचाच परिणाम पाहिला मिळाला. दूध उत्पादकांनी आम्हाला बहुमत दिलंय. महायुतीमध्ये होणारे वाद पाहून लोकांनी आम्हाला निवडले. शेवटी एक होणार होते तर आधी वाद का केला? असा सवालही पाटील यांनी केला. त्यांच्या शपथांचा परिणाम मतदारांवर झाला नाही. तसेच गोकुळचा कारभार हा एकमुखी कारभार असावा, तो जिल्ह्यातूनच चालवा हे लोकांना वाटतं.
“दूध उत्पादकांनी आम्हाला बहुमत दिले आहे. जर जनरल कोट्यातून ९८ मते बाद झाली नसती तर आमच्या अजून ८ जागा वाढल्या असत्या. काही मते अवैध ठरली नाहीतर आमच्या आघाडीने २० जागा जिंकल्या असत्या असेही सतेज पाटील म्हणाले.



















