
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, आकुर्डी येथे प्रथम वर्ष बी. आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी ‘प्रारंभ’ इंडक्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून वास्तुशास्त्र क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक प्रवासाची सुरुवात झाली.
कार्यक्रमास डॉ. राजेंद्र तळवारे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे हे प्रमुख पाहुणे, तसेच संदीप महाजन, संचालक व मानव संसाधन विभाग प्रमुख, सार्क विभाग, अस्सा अल्बी हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत रिअर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त), कॅम्पस संचालक बी. एच. शर्मा, मुख्य वित्त अधिकारी तसेच महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. छाया तिरविर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. प्रमुख पाहुणे व सन्माननीय अतिथींनी वास्तुविशारदांच्या समाजातील भूमिकेवर तसेच भावी वास्तुविशारदांच्या जबाबदाऱ्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रिअर अॅडमिरल अमित विक्रम (निवृत्त) यांनी शिस्त व महाविद्यालयातील नियमांचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवास, परीक्षा-संबंधित अनुशासन आणि महाविद्यालयीन मार्गदर्शक तत्त्वांची माहिती देण्यात आली. तसेच महाविद्यालयातील विविध प्राध्यापकांची विद्यार्थ्यांशी ओळख करून देण्यात आली.
या कार्यक्रमामुळे नव्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन वातावरण, शैक्षणिक पद्धती आणि वास्तुशास्त्र क्षेत्रातील भविष्यातील संधी यांची माहिती मिळाली.या कार्यक्रमास सतेज पाटील, अध्यक्ष, डॉ. डी. वाय. पाटील प्रतिष्ठान, आकुर्डी शैक्षणिक संकुल, तेजस पाटील, विश्वस्त,स्नेहा तेजस पाटील संचालक – कार्यप्रणाली, आणि रिअरॲडमिरल अमित विक्रम (निवृत्त), कॅम्पस संचालक, डी.वाय. पाटील एज्युकेशन कॅम्पस यांचे मोलाचे मार्गदर्शन
लाभले. आनंदी चेहरे, गोड आठवणी आणि प्राध्यापकांच्या
शुभेच्छांसह कार्यक्रमाची सांगता झाली.

















