आगामी लोकसभा निवडणुकांचे पार्श्वभुमीवर पिंपरी चिंचवड पोलीसांकडून मोठ्या गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणावर मोक्का, एमपीडीए व तडीपारीची कारवाई
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- आगामी लोकसभेच्या निवडणुका ह्या भयमुक्त, पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पाडता याव्या यासाठी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी व्यापक प्रतिबंधक कारवाईचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार नुकतेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीएसह तडीपारीची मोठी कारवाई करण्यात आली आहे.
या वर्षात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील ०३ संघटीत गुन्हेगारी टोळ्यांमधील एकुण १९ आरोपींवर मोका कायद्या अंतर्गत व ०३ आरोपींवर एमपीडीए कायद्या अंतर्गत आणि १७ गुन्हेगारांवर तडीपारी कारवाई, असे एकुण ३९ गुन्हेगारांवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणूका सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ही कारवाई यापुढेही चालू राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आल्यामुळे गुन्हेगारांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नुकतीच सराईत गुन्हेगारांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार पिंपरी पोलीस ठाणेतील १) सुरज उत्तम किरवले, वय २४ वर्षे, रा. रुम नं. बी. ५ बिल्डींग, स्पाईन रोड, घरकुल, चिखली, पुणे (टोळी प्रमुख), २) यश ऊर्फ पाशा कैलास भोसले, वय २१ वर्षे, रा. मोनिता किराणा स्टोअर्स जवळ, आंबेडकर कॉलनी, रिव्हर रोड, पिंपरी, पुणे. ३) अविनाश प्रकाश माने, वय २२ वर्षे, रा. बौध्द विहार, पाण्याच्या टाकी मागे, माताजी मंदीराजवळ, बौध्दनगर, पिंपरी पुणे. ४) गणेश जमदाडे, रा. भाटनगर, पिंपरी पुणे, यांचेविरूध्द खुन, खुनाचा प्रयत्न, दरोडा, दरोडयाची तयारी, गंभीर दुखापत, दुखापत, अग्निशस्त्रे जवळ बाळगणे असे एकुण ०६ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दित दाखल आहेत.
वाकड पोलीस ठाणेतील १) रोहीत मोहन खताळ, वय २१ रा. दगडू पाटील नगर, लेन नं.३ थेरगाव, पुणे, (टोळी प्रमुख). २) साहील हानीफ पटेल, वय २१ रा. आंबेडकर वसाहत, आंबेडकर शाळे शेजारी, वैष्णवी किराणा शॉप जवळ, लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे, ३) ऋषीकेश हरी आटोळे, वय २१ रा. बेलठीकानगर, मेडीप्लस मेडीकल समोर, शिवदर्शन कॉलनी, थेरगाव, पुणे, ४) शुभम चंद्रकांत पांचाळ, वय २३ रा. अष्टविनायक कॉलनी, भाग्यश्री निवास समोर, काळेवाडी, पुणे, ५) अनिकेत अनिल पवार, वय २७ रा. बारणे कॉर्नर, पवारनगर, लेन नं. २. थेरगाव पुणे, ६) प्रितम सुनिल भोसले, वय २० रा. लेन नं. १, पिठाचे गिरणीजवळ, आदर्शनगर, काळेवाडी, पुणे. ७) शिवशंकर शामराव जिरगे, वय २२ रा. दत्तनगर, मारुती गुजर चाळ, बिर्ला हॉस्पीटल समोर, थेरगाव, पुणे, ८) सुमित सिद्राम माने, वय २३ रा. शिवराजनगर लेन नं. २. भारत गॅस एजन्सी जवळ, रहाटणी पुणे, ९) गणेश बबन खारे, वय २६ रा. दिसले यांची खोली, दगडु पाटील नगर, लेन नं. ३, अभिनव दुध डेअरी समोर, थेरगाव, पुणे, १०) अजय भिम दुधभाते, वय २२ रा. डोंगरे कॉर्नर, गणेश मंदीर जवळ, पडवळनगर, लेन नं. ६, थेरगाव, पुणे, ११) मुन्ना एकनाथ वैरागर, वय २१ रा. नागुबाई बारणे शाळेसमोर, पवारनगर, थेरगाव, पुणे, १२) कैवल्य दिनेश जाधवर, वय १९ रा. उंड्री, स्टार बाजार शेजारी, बी – २/१०२, हडपसर, पुणे यांचेविरूध्द खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, दरोडा, जबरी चोरी, खंडणी, वाहनांची तोडफोड करणे, व बेकायदेशीर जिवघेणी हत्यारे / अग्निशस्त्रे जवळ बाळगणे, असे एकुण १९ गुन्हे अंबाजोगाई शहर पोलीस ठाणे. जि. बीड, व अहमदनगर शहर पोलीस ठाणे व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दित दाखल आहेत.
निगडी पोलीस ठाणेतील १) अमन शंकर पुजारी, वय २२ रा. कोंडीबा चाळ, खोली नं. ९ पांढारकर वस्ती, पंचतारानगर, आकुर्डी, पुणे (टोळी प्रमुख), २) शिवम सुनिल दुबे, वय २१ रा. पांढारकर चाळ, पाटील दवाखान्याचे पाठीमागे पंचतारानगर, आकुर्डी पुणे, ३) रत्ना मिठाईलाल बरुड, वय ३६ रा. प्रकाश देवडेकर यांचे बंगल्यात, नारायण कॉम्प्लेक्स, पांढारकर वस्ती चौक, पंचतारानगर, आकुर्डी, पुणे, यांचेविरूध्द कट करुन खून करणे, दरोडा, दुखापत, तोडफोड करणे, बेकायदेशीररित्या घातक हत्यारे जवळ बाळगणे, असे एकुण ०६ गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हद्दित दाखल आहेत.
या ३ टोळ्यामधील सर्व आरोपी यांनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणूनच त्यांच्या विरुध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ अंतर्गत कारवाई करणे बाबत प्रस्ताव पोलीस आयुक्त कार्यालय येथे सादर केला असता सदर प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करून नमूद गुन्ह्यांत महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ मधील कलमांचा अंतर्भाव करण्याचे आदेश पारीत केलेले आहेत.
तसेच १) वाकड पोलीस ठाणे हद्दीतील कुप्रसिध्द गुन्हेगार संदेश ऊर्फ शिलव्या लाजरस चोपडे, रा. अमरदिप कॉलनी, काळेवाडी, पुणे. याच्यावर एकुण १४ गुन्हे दाखल आहेत. २) दिघी पोलीस ठाणे हद्दीतील कुप्रसिध्द गुन्हेगार अनिकेत ऊर्फ गुड्या संजय मेटकरे, रा. गणेशनगर कॉलनी क्र. ३. भारतमातानगर, दिघी, पुणे. याच्यावर एकुण ०३ गुन्हे दाखल आहेत. ३) पिंपरी पोलीस ठाणे हद्दीतील कुप्रसिध्द गुन्हेगार दिपक सुरेश मोहिते, रा. विजयप्रभा हौ. सोसायटी, नेहरूनगर, पिंपरी, पुणे याच्यावर एकुण १० गुन्हे दाखल आहेत. या ०३ कुप्रसिध्द गुन्हेगारांना एमपीडीए कायद्या अंतर्गत येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द करण्याचे आदेशही पोलीस आयुक्त यांनी पारीत केले आहेत.
तसेच पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. त्यांची नावे खालील प्रमाणे
१) आनंद किशोर वाल्मिकी (वय २९ रा. काळा खडक वाकड, पुणे)
२) संकेत माणिक कोळेकर (वय २२ रा धामणे ता. खेड जि पुणे)
३) आकाश बाबु नडविन मणी (वय २१ रा. मोरे वस्ती चिखली)
४) आशिष एकनाथ शेटे (वय २४ रा. नखाते वस्ती रहाटणी पुणे)
५) रोहित /गब-या राजस्वामी (वय २२ रा. एमबी कॅम्प देहुरोड, पुणे)
६) रुषिकेश /श-या अडागळे (वय २४ रा गांधीनगर देहुरोड पुणे)
७) सुरज रामहरक जैस्वाल (वय २१ मिठु शठे चाळ नेहरुनगर पिंपरी)
८) शुभम राजु वाघमारे (वय २२ रा. विठठलनगर नेहरुनगर पिंपरी पुणे)
९) वृषभ नंदु जाधव (वय २१ रा. इंदिरानगर चिंचवड पुणे)
१०) शेखर/बका बाबु बोटे (वय २० रा. इंदिरानगर चिंचवड पुणे)
११) शुभम अशोक चांदणे (वय १९ रा. इंदिरानगर चिंचवड पुणे)
१२) शांताराम मारुती विटकर (वय ३४ रा. इंदिरा नगर चिंचवड पुणे)
१३) अनुराग दत्ता दांगडे (वय १९ रा. इंदिरा नगर चिंचवड पुणे)
१४) सागर ज्ञानदेव ढावरे (वय २० रा. मिलींदनगर पिंपरी पुणे)
१५) पंकज दिलीप पवार (वय ३२ रा आण्णासाहेब मगर चिंचवड पुणे)
१६) सोन्या / महेश श्वेणसिध्द कांबळे (वय २१ रा. दत्तनगर चिंचवड पुणे)
१७) आनंद नामदेव दणाणे (वय ३१ रा विद्यानगर, चिंचवड पुणे)
कारवाई ही पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उप-आयुक्त, (गुन्हे) संदिप डोईफोडे, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-१ स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ०२ बापु बांगर, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-३ डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त, वाकड/चिंचवड विभाग विशाल हिरे, सहायक पोलीस आयुक्त, चाकण/भोसरी एमआयडीसी विभाग राजेंद्रसिंह गौर, सहायक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग बाळासाहेब कोपनर, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे-१ डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, निता उबाळे, स.पो.नि., वर्षा जगदाळे, स.पो.नि. पी.सी.बी. गुन्हे शाखा, तसेच अंमलदार पोलीस हवालदार सचिन चव्हाण, पो.हवा. व्यंकप्पा कारभारी, पी.सी.बी. गुन्हे शाखा, श्रे. पोउनि, सुहास पाटोळे, वाकड पोलीस ठाणे, पो.हवा. शरद विंचु, दिघी पोलीस ठाणे, पो.हवा. गणेश सोनटक्के, निगडी पोलीस ठाणे, पो.ना. ओंकार बंड, पिंपरी पोलीस ठाणे, यांचे पथकाने केली आहे.