
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कानपूर येथील ‘पब्लिक राइटर्स फाउंडेशन’ संस्थेने सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान देणारे अशोक जयवंत शेळके यांची संस्थेच्या State President (राज्य अध्यक्ष) पदावर नियुक्ती केली आहे. दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
अशोक शेळके यांच्या सामाजिक कार्यातील योगदान, समाजसेवेप्रती असलेली निष्ठा आणि समर्पणाची दखल घेत संस्थेने ही जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या कार्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण, सन्मान आणि सक्षमीकरणाशी जोडण्यास मदत होईल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला आहे.
संस्थेच्या धोरणांचा व विचारांचा जन-जनात प्रसार करण्यासाठी शेळके महत्त्वाची भूमिका बजावतील, तसेच समाज आणि राष्ट्राच्या विकासासाठी सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी त्यांच्या कार्याचा उपयोग होईल, असे नियुक्तीपत्रात नमूद करण्यात आले आहे.
या नव्या जबाबदारीबद्दल अशोक जयवंत शेळके यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

















