
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडुनिया गाठ”
या वृत्ती प्रमाणे वैष्णवांचा मेळा ज्ञानोबा- तुकोबांच्या नामाचा जयघोष करत, पालखी सोहळ्यामध्ये आनंदात,टाळ मृदंगाच्या गजरामध्ये अत्यंत भक्तिभावाने मार्गक्रमण करीत पुण्याच्या दिशेने जात असताना सोहळ्यामध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी झाले होते अत्यंत शिस्तीत,भक्ती रसात न्हाऊन वारी विठ्ठुरायाच्या भेटीसाठी आतुर होऊन मार्गस्थ झाली.हा केवळ एक प्रवास नसून भक्ती आणि शक्तीचा एक अद्वितीय सोहळा आहे.
सोहळ्यामध्ये अनेक भाविक श्रद्धेने वारकरी संप्रदायातील वारकरी बांधवांना पिण्यासाठी पाणी, खाद्यपदार्थाचे वाटप करीत असतात.वारीपुढे जात असताना पाठीमागे भरपूर कचरा, प्लास्टिक, खाद्यपदार्थचे प्लास्टिक,पुठ्ठे वाटेवर सोडून जातात.गुणवंत कामगार कल्याण मंडळ व पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने
महास्वच्छता अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.वारी पुढे निघून गेल्यावर कचरा एकत्र करून त्याची वर्गवारी करून वेगळा करुन महानगरपालिकेच्या वाहनां मार्फत विघटन स्थळी हलविण्यात आला.
तानाजी एकोंडे,भरत शिंदे,मोहम्मद शरीफ मुलानी, शहराध्यक्ष-बाळासाहेब साळुंके,आण्णा गुरव, शिवराज शिंदे, संदीप रांगोळे,महेंद्र गायकवाड , अशोक सरतापे,पांडुरंग सुतार, परशुराम पार्टे , दत्तात्रेय अवसरकर, रघुनाथ फेगडे, सोमनाथ पतंगे, नंदकुमार धुमाळ, यामध्ये पालिकेचे कर्मचारी व आरोग्य अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पिंपरी चिंचवड महानगरपालिका व गुणवंत कामगार कल्याण मंडळ महाराष्ट्र राज्य दरवर्षी पालखी सोहळ्यामध्ये स्वच्छता अभियान राबवत असते यावेळी एक टेम्पो कचरा जमा करण्यात आला.



