
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पवना नदीला आलेल्या पुरामुळे पिंपळे सौदागर-रहाटणी परिसरातील अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. या नागरिकांसाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अण्णासाहेब मगर विद्यालयात तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
या ठिकाणी भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक शत्रुघ्न (बापू) काटे, नगरसेविका अनिता संदीप काटे आणि नगरसेविका कुंदा संजय भिसे यांच्या वतीने पूरग्रस्तांसाठी तात्काळ जेवण व इतर आवश्यक सुविधांची व्यवस्था करण्यात आली.
आपत्तीच्या या कठीण काळात नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये, यासाठी मदतकार्य सातत्याने सुरू असून प्रशासनासोबत लोकप्रतिनिधीही सक्रियपणे कार्यरत आहेत. यावेळी जयनाथशेठ काटे, निलेश काटे तसेच अन्य सहकाऱ्यांनीही सेवा कार्यात सहभाग घेतला.



