ताज्या घडामोडीपिंपरी

लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊंचे कर्तृत्व युवा पिढीला प्रेरणादायी – शंकर जगताप

Spread the love

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ हे एक समर्पित जनसेवक आणि कल्पक नेता होते. त्यांनी शहराच्या विकासासाठी अनेक महत्वाची कामे केली. गरिब आणि गरजू लोकांसाठी त्यांच्या मनात सदैव प्रेम होते. त्यांचे कर्तृत्व आणि कार्यक्षमता युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी केले.

पिंपरी चिंचवड भाजपाचे माजी शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या जयंती निमित्त त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी गुरुवार, दि. १५ रोजी भाजप कार्यालय, पिंपरी मोरवाडी या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कार्याचा उजाळा देताना ते बोलत होते. प्रसंगी, स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

शंकर जगताप म्हणाले, “स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजासाठी आणि लोकांसाठी काम केले. ते नेहमीच गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीला हजर असायचे. त्यांच्या कार्यशैलीमुळे ते लोकांमध्ये अत्यंत लोकप्रिय होते. युवा पिढीने स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कर्तृत्वापासून प्रेरणा घेऊन समाजासाठी आणि लोकांसाठी काम करायला हवे,” असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस संजय मंगोडेकरअजय पाताडेशैला मोळकमहिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडेयुवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, दक्षिण भारत आघाडी महाराष्ट्र प्रदेश संयोजक राजेश पिल्ले,  चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणेपिंपरी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित गोरखेमंडल अध्यक्ष संदीप नखातेनिलेश अष्टेकरसोमनाथ भोंडवे,  माजी नगरसेवक माऊली थोरातअभिषेक बारणेहर्षल ढोरेमोरेश्वर शेडगे, शेखर चिंचवडे, दिपक भंडारी, मधुकर बच्चे, गोपाळ मळेकर, गणेश वाळुंजकर, मनोज ब्राम्हणकर, सचिन काळभोर, खेमराज काळे, प्रदीपकुमार बेंद्रे, वैशाली खाडये, सुधीर साळुंखे, प्रदिप साळुंखे, संदेश गादिया, राजश्री जायभाय, तानाजी बारणे, विनोद तापकीर, जवाहर ढोरे, रविराज कोद्रे, प्रज्ञा हिटनाळीकर, सिमा चव्हाण, अश्विनी कांबळे, पल्लवी मारकड, रोहिणी रासकर, पल्लवी पाठक, दिपाली कलापूरे, रेखा काटे, कोमल गौडांडकर, रविंद्र प्रभुणे, दिनकर शिंपी, प्रकाश लोहार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सदाशिव खाडे म्हणाले की, स्व. लक्ष्मणभाऊ जगताप हे पिंपरी चिंचवड शहरातील एक लोकप्रिय नेते होते. विधानसभा सदस्य, महापौर आणि नगरसेवक म्हणून कार्यरत असताना त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण कार्ये केली. शहराचा विकास पुरुष म्हणून त्यांची ओळख कायम स्मरणात राहणार आहे.

राजू दुर्गे म्हणाले की, राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना लोकनेते स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांनी सर्वांना सोबत घेवून विकासाला दिशा दिली. कार्यकर्त्यांना समान संधी देवून महापालिकेत भाजपाची सत्ता खेचून आणली. दूरदृष्टी ठेवत पिंपरी चिंचवड शहराचे पालकत्व स्वीकारून आंतरराष्ट्रीय शहराचा बहुमान मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावली. त्यांचे कार्य नेहमीच स्मरणात राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button