चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड मधील नामांकित असलेल्या चिंचवड येथील कमला एज्यूकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने यंदाच्या बारावीच्या परीक्षेत उत्तुंग यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या परीक्षा उत्तीर्ण होत कॉलेजच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे.
यंदाच्या निकालात विज्ञान शाखेतून कु. मिहीका आठल्ये ही ९५ टक्के गुण मिळवून प्रथम, कु.आर्या कुलकर्णी ९३ टक्के गुण मिळवून द्वितीय तर कुमार कुशल तशीलदार हा ९२.३३ टक्के गुण मिळवून तृतीय आला. वाणिज्य शाखेतून कुमार हशीर अत्तार हा ९४.८४ टक्के गुण मिळवून प्रथम व कु.श्रावणी राजे शिर्के ही ९३.८३ टक्के गुण मिळवून द्वितीय आली तर कुमार हेमंत चौधरी हा ९३.६७ टक्के गुण मिळवून तृतीय आला तसेच कला शाखेतून ही कु.आस्था शहा हिने ९०.६७ टक्के गुण मिळवून प्रथम आली व कु.मेधा भट ८९ टक्के गुण मिळवून द्वितीय आणि कुमार जय पणमंद याने ८५ टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
कॉलेजमधील विशेष गुणवंत विद्यार्थी कुमार सुचिर देशमुख- गणित, कुमार मिहीका आठल्ये – गणित आणि जर्मन, कुमार हेमंत चौधरी- अकाउंट,आयटी आणि गणित तसेच कुमार हसीर आत्तार, कुमार चैतन्य दातीर, कु.सुहानी पांचाळ- अकाऊंट .या सर्व विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विषयांमध्ये *शंभर पैकी शंभर* गुण मिळवून महाविद्यालयाचे नाव उज्वल केले आहे.
कॉलेजच्या प्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करत सांगितले की, “विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळे आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाले आहे. भविष्यातही अशीच उत्तम परंपरा कायम ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील.”
विद्यार्थ्यांनी देखील आपल्या यशाचे श्रेय पालक, शिक्षक आणि कॉलेजच्या सकारात्मक वातावरणाला दिले आहे. परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
संस्थेकडून कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक, सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा संचालिका डॉ. तेजल शहा, संस्थेचे मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ राजेंद्र कांकरिया तसेच सर्व प्राध्यापक वर्ग या सर्वांनी विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
प्रतिभा ज्युनिअर कॉलेजच्या बारावीच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश
Previous Articleसहिष्णू समाजाने असहिष्णू विचार नष्ट करावेत! – प्रदीप रावत

