ताज्या घडामोडीपिंपरी
पद्मपुरस्कार, छत्रपती, अर्जुन अथवा क्रीडा पुरस्कारर्थीना महापालिकेकडून मोठ्या मदतीची अपेक्षा- पद्मश्री मुरलीकांत पेटकर
पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड शहरातील पद्मपुरस्कार, छत्रपती, अर्जुन अथवा क्रीडा पुरस्कारर्थीना महापालिकेकडून मोठ्या मदतीची अपेक्षा असल्याचे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी यावेळी सांगितले.
पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने “माझे शहर माझा अभिमान” या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि.10/02/ 2024 रोजी हाँटेल कलासागर कासारवाडी, पिंपरी येथे करण्यात आला यावेळी व्यासपीठावर आमदार उमाताई खापरे, उद्योजक संतोष बारणे, कामगार नेते यशवंत भोसले, बाळासाहेब ढसाळ, गोविंद वाकडे, नाना कांबळे, प्रविण शिर्के, प्रशांत साळुंखे, अर्चना मेंगडे आदी होते. या कार्यक्रमात शहरातील अनेक वकील, डॉक्टर, अभियंते, आक्रीटेक्ट, व उद्योजक उपस्थित होते.
पद्मश्री पेटकर म्हणाले, अपंगांना ज्या पध्दतीने पेंशन आहे त्या पध्दतीने क्रीडा पुरस्कारर्थीना पेंशन योजना सुरू करावी. तसेच पिंपरी चिंचवड शहराला आयुक्त शेखरसिंह आल्यापासून शहराचा चांगल्या प्रकारे विकास झाला. कोरोना काळापासून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा मिळकतकर वाढवलेला नाही. आजही दिल्लीला बोर्डावर माझ्या नावाखाली पिंपरी चिंचवड लिहिलेले आहे असे पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी सांगितले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या आमदार उमाताई खापरे म्हणाल्याकी, राज्याच्या अनेक भागात मी फीरले आहे परंतु पिंपरी चिंचवड सारखा विकास कोठेही दिसला नाही. या शहरातील रस्ते , उड्डाणपूल, मेट्रो, वैद्यकीय तसेच शैक्षणिक सुविधा अभिमान वाटावा अशाच आहे. पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखरसिंह यांनी शहरासाठी केलेली कामे प्रचंड कौतुकास्पद आहेत असे मत व्यक्त केले.
यावेळी परीषदेचे स्वागताध्यक्ष कामगार नेते यशवंतभाऊ भोसले म्हणाले की, या शहरात हरणामसिंग यांच्या नंतर दुरदृष्टी असलेले शेखरसिंह हे या शहराला लाभले आहेत त्यांनी अनेक चांगली कामे केली आहेत जे चांगले झाले आहे त्याचे कौतुक झालेच पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरात माझ्या आजपर्यंतच्या काळात पिंपरी चिंचवड पत्रकार संघाने घेतलेल्या “माझे शहर माझा अभिमान” या उपक्रमा सारखा स्तुत्य उपक्रम मी पाहिला नाही.
यावेळी बोलताना उद्योजक संतोष बारणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहराचा हा विकास पाहता या शहराला अजूनही खूप मोठे भवितव्य आहे. यावेळी अभय भोर, अजिज शेख, र्कीडा शिक्षक पी.डी. पाटील, नारायण भागवत, गोविंद वाकडे, नाना कांबळे आदींची भाषणे झालीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब ढसाळ होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण शिर्के यांनी केले. सुत्रसंचालन माधुरी कोराड यांनी केले तर आभारप्रदर्शन विशाल जाधव यांनी मानले.