वॉर्ड क्रं १६ रावेत किवळे मधील विकास नगर भागातील कचरा आरोग्य विभागाकडून उचलण्यात यावा – प्रज्ञा खानोलकर

किवळे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वॉर्ड क्रं १६ रावेत किवळे मधील विकास नगर भागातील कचरा आरोग्य विभागा कडून उचलला जात नाही तो वेळेवर उचलला जावा अशी मागणी प्रज्ञा खानोलकर यांनी आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे वॉर्ड क्रं १६ रावेत किवळे मधील विकासनगर भागा मध्ये बरेच ठिकाणी
कचऱ्या चे ढीग साठलेले असतात. तसेच कचरा गोळा करणे साठी गाडी बरेच ठिकाणी येत नाही. सध्या दोन एजन्सी काम करतात. १) एक एजन्सी रस्ता झाडलोट करते. २) दुसरी एजन्सी घरोघरी कचरा गोळा करते.
परंतु झाडलोट करणारी एजन्सी दररोज रस्ता साफसफाई /झाडलोट करत नाही. दहा दिवसांनी रस्ता झाडलोट करते.
झाडलेला कचरा उचलत नाही. मोरया कॉलनी मध्ये दिवाळी कालावधी मध्येझाडलोट न झालेने तेथील नागरिकांनी स्वतः झाडलोट करुन कचरा एका ठिकाणी गोळा केला होता तो उचलणेस सांगितला असता तो आरोग्याचे लोकांनी न उचलले मुळे तेथील नागरिकांनी स्वतः वर्गणी काढून ३००/- रुपये देऊन खाजगी टेम्पो करुन कचरा उचलून घेतला आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे.तसेच घरोघरी बरेच ठिकाणी कचरा गाडी जात नाही. या बाबत आरोग्य निरीक्षक यांना अनेक वेळा तक्रारी
केले आहे परंतु काही उपयोग होत नाही.
सदर पत्राने आपणास विनंती कारणेत येते की आपले कडून संबंधितास सूचना दिलेस काम होईल.













