राष्ट्रवादी महिला काँग्रेस (शरदचंद्र पवार)तर्फे घरकुल येथील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर
खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नातून झालेल्या आरोग्य शिबिरास घरकुल येथील महिलांचा मोठा प्रतिसाद
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक कॅन्सर दिनानिमित्त खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्या संकल्पनेतून भोसरी विधानसभा क्षेत्रातील महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. त्याचा शुभारंभ घरकुल चिखली येथून करण्यात आला.महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली,भोसरी विधानसभा अध्यक्ष सारिका हरगुडे व राजेश हरगुडे यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरामध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर,विषाणू टेस्टिंग,नेत्र तपासणी,मोफत मोतीबिंदू ऑपरेशन व दंतचिकित्सा अल्प दरात त्वरित उपचार या महिलांसाठी आयोजित करण्यात आल्या होत्या. घरकुल परिसरातून महिलांनी तसेच वृद्धांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. सुमारे 200 महिलांच्या मोफत कॅन्सर तपासण्या करण्यात आल्या तर एकूण ४३० लोकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन युवक अध्यक्ष इम्रान भाई शेख,महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर विद्यार्थी सामाजिक कार्यकर्त्या संगीता जोशी,युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर,शहर प्रवक्ता राहुल नेवाळे भोसरी विधानसभा महिला कार्याध्यक्ष शर्वरी शिरुडकर युवक भोसरी विधानसभा अध्यक्ष एडवोकेट संतोष शिंदे भोसरी विधानसभा विद्यार्थी अध्यक्ष नितीन मोरे युवक कार्याध्यक्ष सागर तापकीर नीता महानवर प्रतीक्षा महानवर अर्चना हजारे संगीता हजारे मेघा गावडे मंदाकिनी भांगे शकुंतला बालगुंदे. प्रेमा शेट्टी, रजनीकांत गायकवाड,नितीन शिंदे अनिकेत बिरांगल, अशोक भाऊ मगर, वीर सुतार आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.