ताज्या घडामोडीपिंपरी
गट-तट सोडून शिवसेना आणि राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी आम आदमी पार्टी मधे प्रवेश करावा : मयुर दौंडकर
खेड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तयार झालेल्या गटातटाच्या राजकारणाला अनुसरून आम आदमी पार्टी युवा आघाडी चे प्रदेशाध्यक्ष मयूर दौंडकर यांनी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आम आदमी पार्टीमध्ये सामील होण्याचे आव्हान केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही गट स्वार्थापोटी भाजपा सोबत गेलेले असून सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्ता यापैकी कोणाचही घेणदेणं या नेत्यांना राहीलेल नाहीये. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्याने स्वतःचा वेळ वाया घालवू नये असे देखिल मयूर दौंडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितल. आम आदमी पार्टी ही तरुणांना संधी देणारी पार्टी आहे. तरुण वर्गाने याचा फायदा करून घेतला पाहिजे. असे आव्हान मयुर दौंडकर यांनी केलं. आम आदमी पार्टी येणाऱ्या सर्व निवडणुका महाराष्ट्रामध्ये स्वबळावर ताकदीने लढवणार असल्याचे देखील मयुर दौंडकर यांनी सांगितले. येणाऱ्या काळात महाराष्ट्रासाठी आम आदमी पार्टी हाच एक सक्षम पर्याय असल्याचे मयूर दौंडकर यांनी मत मांडले.