पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने शहराध्यक्ष कुणाल वाव्हाळकर आणि उपाध्यक्ष धर्मपाल तांतरपाळे यांच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. युवक शहराध्यक्ष डॉ. धम्मरत्न गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
कार्यक्रमात पक्षाच्या युवक आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच काही युवकांचा पक्षात प्रवेश करण्यात आला. नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये भारत खरात यांची युवक कार्याध्यक्षपदी, सिद्धांत जगताप व क्रांतिदीप जाधव यांची युवक उपाध्यक्षपदी, राहुल नितनवरे यांची युवक सरचिटणीसपदी, दिलीप मोरे यांची संपर्क प्रमुखपदी आणि निखिल केरणाले यांची संघटन सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त सर्व युवक पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. पक्ष संघटन बळकट करण्यासाठी युवकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.
या कार्यक्रमास चंद्रकांता सोनकांबळे, अझीजभाई शेख, विनोद चांदमारे, बाबा सर्वदे, दादा शिरोळे, राजू उबाळे साहेब, राजेंद्र कांबळे, विलास पाटील, रुक्मिणी पाटील, मायरा मॅडम, बाळासाहेब गायकवाड, योगेश भोसले, किरण सामिंदर, संतोष देंगळे, विकास गाडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराजदादा भास्कर यांनी केले तर आभारप्रदर्शन सोमंथजी उबाळे यांनी केले. कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती लाभली होती.

