Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»चिंचवड»चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप
चिंचवड

चिंचवड देवस्थान ‘ब’ दर्जा पर्यटन क्षेत्र करण्यासाठी प्रयत्न करणार– आमदार शंकर जगताप

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com6 February 2026No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

क”दर्जा पर्यटन विशेष निधीमधून श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन

२ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीतून भाविकांना मिळणार उत्तम दर्जाच्या सुविधा

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड देवस्थान ट्रस्टने कायमच सामाजिक बांधिलकी जपली आहे. सेवा कार्याला धार्मिक अनुष्ठानाची जोड देत समाजात एक आदर्श कायमच स्थापित ठेवला. आरोग्य, स्वच्छता, अनेक सामाजिक कार्यातून मानवतावादी दृष्टिकोन राखला. ज्यातून अनेक प्रकारचे मापदंड प्रस्थापित झाले. आगामी काळात हे आदर्शवत कार्य महाराष्ट्राच्या बाहेरही सर्वदूर पोहोचावे यासाठी देवस्थानला “ब” दर्जा पर्यटन क्षेत्र म्हणून ओळख मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. भविष्यात जास्तीत जास्त निधी देवस्थानला मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. भाविकांना त्या माध्यमातून चांगल्या सुविधा मिळतील असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

“क”दर्जा पर्यटन विशेष निधी मधून
श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा चिंचवड येथे मंदिराच्या प्रांगणात गुरुवारी पार पडला. यावेळी माजी महापौर तथा नगरसेविका अपर्णा डोके, नगरसेवक सुरेश भोईर, अनंत कोऱ्हाळे, नगरसेविका मनीषा चिंचवडे, आशा सूर्यवंशी, मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र महाराज देव, विक्रम दौंडकर तसेच आजी माजी नगरसेवक, भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले,
श्रीमन् महासाधू मोरया गोसावी यांचे नाव महाराष्ट्रात सर्वदूर परिचित आहे. हिंदू धर्मात पाच मुख्य संप्रदाय आहेत. सूर्योपासक, शैव, वैष्णव, गाणपत्य आणि शाक्त. यातील ‘गाणपत्य’ संप्रदाय हा गणपतीलाच मूळ परब्रह्म मानतो. या संप्रदायाच्या गौरवशाली इतिहासातील एक अग्रणी आणि देदीप्यमान ऋषी म्हणजे चिंचवडचे परमपूज्य श्री मोरया गोसावी. म्हणूनच चिंचवडचे मोरया गोसावींचे स्थान, महाराष्ट्रातील गाणपत्य संप्रदायाचे आद्यपीठ म्हणून अत्यंत आदराने घेतले जाते. अशा परम पवित्र देवस्थान आणि मोरया गोसावींच्या चरणी सेवा रुजू करण्याचे संधी मला मिळाली हे मी माझे भाग्य समजतो.

पंतप्रधान नरेंद्र जी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून आपल्या देशाची परंपरा, धार्मिक अनुष्ठान कायम राखण्यासाठी सतत प्रयत्न केले जात आहेत. जगन्नाथ कॅरिडोर, अयोध्या राम लल्ला मंदिर असेल यातून आपल्या परंपरा जतन करण्याचे काम भाजपच्या माध्यमातून झाले आहे. २०२२ मध्ये पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी या देवस्थानला “क” दर्जा पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले. यानंतर लोकनेते आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या माध्यमातून , माजी आमदार अश्विनी जगताप यांनी पुढाकार घेऊन शासनाकडे पाठपुरावा केला. आता मला निधी आणण्याची संधी मोरया गोसावी यांच्या आशीर्वादाने मिळाली या पुढील काळातही देवस्थानची प्रगती, भाविकांना सुविधा यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल. भविष्यात हे देवस्थान “ब ” दर्जा पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार शंकर जगताप म्हणाले.

दरम्यान आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते पवना नदीची आरती करून नदी स्वच्छतेची शपथ यावेळी घेण्यात आली.

जितेंद्र महाराज देव यावेळी म्हणाले, “मोरयाचा धर्म जागवण्या”चे काम आमदार शंकर जगताप यांच्या माध्यमातून देवस्थान ट्रस्ट अधिक वेगाने करत आहे. २०२२ मध्ये या देवस्थानला “क” पर्यटन दर्जा प्राप्त झाला. मात्र त्यानंतर पाठपुरावा आणि निधी मिळवण्याचे काम आमदार जगताप यांच्या प्रयत्नांमुळे तडीस गेले.

या कामांसाठी २ कोटी ५० लाखांचा निधी

मंदिर परिसर व मंगलमुर्ती वाडा परिसर सुशोभीकरण करणे ( २५ लक्ष), पादुकामंदिर, सभा मंडप, संरक्षण भिंत उभारणे (५० लक्ष), मुख्य प्रवेशद्वार जतन संवर्धन व दर्जा वाढ करणे (२५ लक्ष), पेव्हिग ब्लॉक, दगडी टप्पा, स्टेनलेस स्टील रेलिंग, चुन्याची पॉइलिंग, सोलिंग, मुरूम फिटिंग( ५० लक्ष), अत्याधुनिक स्वच्छतागृह बांधणे (१५ लक्ष), पाण्याची टाकी बांधणे (२५ लक्ष), अन्नदानासाठी छत्र बांधणे (२५ लक्ष), भाविकांसाठी बसण्याची व्यवस्था करणे (१० लक्ष),
मंदिर परिसरात सभोवतीच्या पटांगणामध्ये दगडी पायऱ्यांचे बांधकाम करणे (२५ लक्ष) या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी २ कोटी ५० लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.

श्रीमन् महासाधू मोरया गोसावी मंदिर परिसरात होणार असलेली ही विकासकामे केवळ भौतिक स्वरूपातील नसून, ती श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेला पुढील पिढीपर्यंत घेऊन जाणारी आहेत. महासाधू मोरया गोसावी महाराजांनी दिलेल्या मूल्यांवर आधारित सेवा, समर्पण आणि सामाजिक ऐक्य या भावनेतूनच हा विकास घडत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली हे कार्य आकार घेत असून, शासन–प्रशासन, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाविक यांच्या संयुक्त प्रयत्नातून मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. या विकासकामांमुळे केवळ पायाभूत सुविधा सक्षम होणार नाहीत, तर आध्यात्मिक चेतना अधिक दृढ होऊन समाजात सांस्कृतिक एकात्मतेचा संदेश अधिक व्यापकपणे पोहोचेल.

शंकर जगताप
आमदार, पिंपरी चिंचवड शहर
———————————–

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleचार वर्षांनी पिंपरी महापालिकेत कारभारी लोकप्रतिनिधी, शुक्रवारपासून प्रशासकीय राजवट, दालने सज्ज, नगरसेवकांचा कालावधी आजपासून
Next Article पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजप सत्तेसाठी आमदार शंकर जगताप यांचा सिंहाचा वाटा; फेरीवाले-टपरीधारकांच्या प्रश्नांसाठी घेतली मजबूत भूमिका
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.