पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कोल्हापूर जिल्हा निरीक्षकपदी प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या मान्यतेने युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी ही नियुक्ती केली आहे.
विशाल वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड शहराचे युवक अध्यक्षपद भूषवत असताना नागरिकांच्या हिताचे अनेक मुद्दे घेऊन आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. राज्यातील सर्वात कुशल युवक संघटन त्यांनी उभारले होते. याबद्दल त्यांचा सन्मानही करण्यात आला होता. मागील जवळपास दीड वर्षांपासून पक्षाने त्यांच्यावर प्रदेश युवक उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे. ती जबाबदारीही त्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून सार्थ ठरविण्याचा प्रयत्न केला आहे. आता पक्षाने नवीन जबाबदारी देत त्यांना कोल्हापूर जिल्हा निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
आपल्या नियुक्ती बद्दल बोलताना विशाल वाकडकर यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड महापालिकेतील तसेच तसेच प्रदेश उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून राज्यातील युवकांचे अनेक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहे. कोल्हापूर जिल्हा निरीक्षक पदाची नियुक्ती सार्थ ठरविण्याचा आपला प्रयत्न असणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचारानुसार काम करून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सर्वसामान्य युवकांच्या विकासात भरीव कार्य करण्याला आपले प्राध्यान्य असणार आहे. पक्षातील सर्व ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना पक्ष संघटना वाढीस प्रोत्साहन देणार आहे.

















