ताज्या घडामोडीपिंपरी

वकिल संरक्षण कायदा, तसेच शहरातील वकिलांचे विविध प्रश्नांच्या संदर्भात पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार अससोसिएशनचे बार कौन्सिलला निवेदन

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ॲडव्होकेट्स प्रोटेक्शन ॲक्ट तात्काळ मंजूर झाला पाहिजे या मागणीसाठी मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनात पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन मधील सिनियर ॲडव्होकेट माजी अध्यक्ष व विद्यमान अध्यक्ष व कमिटी सहभागी होऊन आंदोलनास पाठिंबा दिला. सदर आंदोलनास संपूर्ण महाराष्ट्रातून अभूतपूर्व पाठिंबा मिळत आहे.

पिंपरी बार सह महाराष्ट्रातील अनेक वकील संघटनेच्या वतीने न्यायालयीन कामकाजापासून वकील अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला होता अशा वकिलांसाठी महत्वाचे असणाऱ्या प्रश्नांच्या अनुषंगाने काल वकील संरक्षण कायदा व पिंपरी चिंचवड मधील वकिलांचे विविध प्रश्न घेऊन बार कौन्सिलचे ऑफ महाराष्ट्र अँड गोवा चे विद्यमान अध्यक्ष ॲड.परिजात पांडे सर यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी बार कौन्सिलचे विद्यमान उपाध्यक्ष ॲड.राजेंद्र उमाप जी, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य ॲड.जयंत जायभावे, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाचे मा. अध्यक्ष ॲड.विठ्ठल आबा कोंडे देशमुख, मा.अध्यक्ष ॲड.गजानन चव्हाण, मा.अध्यक्ष ॲड.अविनाश भिडे, मा.अध्यक्ष ॲड.संग्राम देशमुख, मा.उपाध्यक्ष ॲड.सुदीप पासबोला उपस्थित होते. यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे मा.अध्यक्ष ॲड.एस.बी.चांडक, ॲड.किरण पवार त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष ॲड.रामराजे भोसले यांनी बार कौन्सिलच्या सन्मानीय सदस्यांसमोर वकिलांचे विविध प्रश्न मांडले वकील संरक्षण कायदा, ई-फायलिंग संदर्भातील अडचणी संदर्भात निवेदन देत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू करण्यात आलेल्या वकिलाच्या पदवी व सनद पडताळणी संदर्भात यावेळी माहिती घेण्यात आली. याप्रसंगी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या विद्यमान उपाध्यक्षा ॲड.प्रतीक्षा खिलारी,सचिव ॲड.धनंजय कोकणे,महिला सचिव ॲड.मोनिका सचवणी,सह सचिव ॲड.उमेश खंदारे, ऑडिटर ॲड.संदीप तापकीर सदस्या ॲड.मिनल दर्शीले, ॲड.मंगेश खराबे, ॲड.मानसी उदासी ,ॲड.विवेक राऊत,ॲड.शंकर घंगाळे, मा. महिला सचिव ॲड. मोनिका गाढवे, ॲड.रामहरी कसबे,ॲड.चेतन सुखेजा, ॲड.नरसिंह इंगळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button