भारतीय तरूणांना जगभरात संधी – आशिष अचलेरकर
ज्येष्ठ विचारवंत डॉ. संदीप वासलेकर यांच्या ‘एका दिशेचा शोध’ पुस्तकाच्या रौप्यमहोत्सवी आवृत्तीचे प्रकाशन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मनातील भीती, न्यूनगंड हा तरुणांच्या प्रगती मधील अडथळा आहे. विशेषतः ग्रामीण भागातून आलेल्या तरुणांमध्ये हे अधिक जाणवते. जगभरात भारतीय तरुणांना खूप संधी आहेत. आगामी काळ भारतीय तरुणांचा आहे, असे प्रतिपादन अमेरिकेतील उद्योजक आशिष अचलेरकर यांनी केले.
ज्येष्ठ विचारवंत डॉ संदीप वासलेकर यांच्या ‘एका दिशेचा शोध’ पुस्तकाच्या रौप्यमहोत्सवी आवृत्तीचे प्रकाशन पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे बुधवारी (दि ३१) झाले. पिंपरी चिंचवड विद्यापीठ व महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी मंडळ पुणे यांच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीयू) उपाध्यक्षा पद्मा भोसले, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, डॉ. संदीप वासलेकर, विद्यार्थी सहाय्यता समितीचे अध्यक्ष प्रतापराव पवार, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष सचिन इटकर, नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे संचालक विलास शिंदे, तरल इंडियाचे कार्यकारी संचालक भरत गीते, कॉमन सेन्सचे संस्थापक सागर बाबर, कृषी विकास प्रतिष्ठान बारामतीच्या सुनंदा पवार, लंडन येथील उद्योजिका आर्या तावरे उपस्थित होते.
अचलेरकर यांनी अमेरिकेतील आपला उद्योजकीय प्रवास उलगडून दाखवतानाच लोणी प्रवरा येथील आपल्या सर्वसामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी सांगत श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. विशेषतः तरुणांनी त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पिंपरी चिंचवड विद्यापीठाने या समारंभात बीज भाषण करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात डॉ. वासलेकर यांनी विलास शिंदे, भरत गीते, सागर बाबर, सुनंदा पवार, आर्या तावरे यांच्या मुलाखती घेतल्या. दहा वर्षांपूर्वी अत्यंत खडतर परिस्थितीशी सामना करत या पाचही जणांनी उद्योजकतेची कास धरली व पुढील दशकात त्यांनी आपला उद्योग जबरदस्त वाढवला. उद्योजकतेच्या या प्रवासातील अनुभव सांगत उपस्थितांशी संवाद साधला.
पिंपरी चिंचवड विद्यापीठाने अल्पावधीतच मोठी भरारी घेतली.आगामी काळात पीसीयु आणखी मोठी झेप घेईल असे डॉ. संदीप वासलेकर म्हणाले. या कार्यक्रमात विद्यार्थी सहाय्यक समितीचा गौरव पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या वतीने करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रताप पवार व समितीच्या सदस्यांनी स्मृती चिन्हाचा स्वीकार केला. पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या वाटचालीची एक चित्रफित कार्यक्रमात दाखवण्यात आली. या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
————————————-