पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २० मध्ये निवडणूक रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच राजेश वाबळे यांच्या पॅनलने केलेल्या आक्रमक आणि शिस्तबद्ध प्रचाराने विरोधकांच्या गोटात प्रचंड धडकी भरली आहे. राजेश वाबळे यांच्या पॅनलमध्ये विनोद वाघमारे, वैशाली राजेश वाबळे, स्वीटी मलतपुरे यांचा घराघरांत पोहोचणारा संपर्क, गल्लीबोळातून होणाऱ्या प्रचारफेऱ्या, नागरिकांशी थेट संवाद आणि विकासकामांचा ठोस लेखाजोखा यामुळे वाबळे पॅनलचा प्रचार सध्या केंद्रस्थानी आला आहे.
राजेश वाबळे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलमधील सर्व उमेदवार एकसंधपणे मैदानात उतरले असून ‘काम बोलते, आश्वासने नाही’ या भूमिकेवर प्रचार सुरू आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला सुरक्षा आणि युवकांसाठी संधी या मुद्द्यांवर मतदारांशी थेट संवाद साधण्यात येत आहे. विशेष म्हणजे, प्रचारादरम्यान नागरिकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता विरोधकांच्या प्रचाराला फिका रंग चढताना दिसत आहे.
या प्रचार मोहिमेत युवक, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याने वातावरण अधिकच तापले आहे. “प्रभागाचा विकास कोण करू शकतो, हे जनतेला माहिती आहे,” अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येत असून, वाबळे पॅनलच्या प्रत्येक सभेला आणि प्रचारफेरीला वाढती गर्दी हे त्याचे स्पष्ट संकेत मानले जात आहेत.
राजकीय वर्तुळात चर्चा अशी आहे की, वाबळे पॅनलचा वाढता प्रभाव पाहता विरोधकांचे गणित बिघडले असून, रणनीती बदलण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. काही ठिकाणी विरोधकांकडून टीकेची धार वाढवली जात असली, तरी प्रत्यक्ष मैदानात मात्र वाबळे पॅनलचा प्रचार अधिक प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे.
प्रभाग २० मध्ये राजेश वाबळे यांच्या पॅनलचा आक्रमक प्रचार, संघटनात्मक ताकद आणि जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता निवडणूक लढत एकतर्फी होत असल्याची चर्चा सुरू झाली असून, विरोधकांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता हीच वाबळे पॅनलच्या ताकदीची पावती मानली जात आहे.

