ताज्या घडामोडीपिंपरी

“प्रभागाच्या विकासालाच प्राधान्य; मतदार ठामपणे आमच्या पाठीशी” – चेतन पवार

Spread the love

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभागातील विकास हाच आपला एकमेव अजेंडा असून, येत्या काळात नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर ठोस काम केले जाईल, असा ठाम निर्धार प्रभाग 25 मधील उमेदवार चेतन पवार यांनी व्यक्त केला. प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना त्यांनी विकासकामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची ग्वाही दिली.

चेतन पवार म्हणाले की, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि ताथवडे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी नियोजनबद्ध काम केले जाईल. केवळ आश्वासनांवर नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून विकास साधण्याचा आमचा संकल्प आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रचाराच्या दरम्यान प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, “या प्रभागातील मतदार आमच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत” असा विश्वास चेतन पवार यांनी व्यक्त केला. जनतेचा वाढता पाठिंबा पाहता प्रभागात परिवर्तनाची लाट निर्माण झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
सध्या प्रभाग 25 मध्ये विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवली जात असून, पारदर्शक कारभार आणि नागरिकांशी थेट संवाद हाच चेतन पवार यांच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button