ताज्या घडामोडीपिंपरी

महिलांचे सक्षमीकरण म्हणजे सामाजिक प्रगती; डॉ. बाबासाहेब कांबळे यांची भावना

महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपक्रमांची आवश्यकता- योगेश बहल

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कष्‍टकऱ्यांचे नेते डॉ. बाबासाहेब कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्‍या विविध कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी उपक्रमांची आवश्यकता असभ्‍याचे मत योगेश बहल यांनी व्‍यक्‍त केले. तर ‘महिलांचे सक्षमीकरण म्हणजे सामाजिक प्रगती’ अशी भावना डॉ. बाबासाहेब कांबळे यांनी यावेळी व्‍यक्‍त केली.

यावेळी राष्‍ट्रवादीचे शहराध्‍यक्ष योगेश बहल, माजी विरोधी पक्षनेते राहूल भोसले, अजित गव्हाणे, डब्बू आसवानी, वैशाली घोडेकर, ज्ञानेश्वर कांबळे, विशाल मासूळकर, राहुल डबाळे, सुवर्णा डंबाळे, मुमताज शेख, संतोष निसगंध, संदिपान झोंबाडे, बळीराम काकडे, प्रल्हाद कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. बाबासाहेब कांबळे म्‍हणाले की, महापालिकेत कष्टकरी जनतेचे प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे. महापालिका निर्णय प्रक्रिया कष्टकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्या प्रतिनिधींना सभागृहात स्थान मिळाले पाहिजे.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मैदानावर ‘खेळ रंगला पैठणीचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोठी गर्दी उसळली. लकी ड्रॉमधून निवडलेल्या माधुरी चोपडे, दमयंती जाधव, अरुणाताई आणि साक्षी बनसोडे, यांना पैठणी, सोन्याची नथ, फ्रीज, टीव्ही आदी बक्षिसांचे वाटप करण्‍यात आले. खराळवाडी येथे आयोजित इलेक्ट्रिक टू-व्हीलर चावी वाटप सोहळ्यात अंजली नखाते, पायल वैभव गायकवाड, रूपाली महेंद्र भालेराव आणि संगीता मुद्दल या भाग्यवान महिलांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तथा माजी महापौर योगेश बहल यांच्या हस्ते इलेक्ट्रिक टू-व्हीलर प्रदान करण्यात आल्या. “महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे,” असे मत बहल यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्‍या आयोजनासाठी आशा बाबासाहेब कांबळे, मधुरा डांगे, मिनू गिल, रेखा भालेराव, विनोद वरखडे, प्रकाश यशवंते आणि शुभम तांदळे यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button