Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»चिंचवड»चिंचवडमध्ये संगीत आणि भक्तीच्या मिलाफाने ६ ते १० डिसेंबर दरम्यान रंगणार ४६४ वा मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा
चिंचवड

चिंचवडमध्ये संगीत आणि भक्तीच्या मिलाफाने ६ ते १० डिसेंबर दरम्यान रंगणार ४६४ वा मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com4 December 2025No Comments4 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

 

चिंचवडमध्ये संगीत आणि भक्तीच्या मिलाफाने ६ ते १० डिसेंबर दरम्यान रंगणार ४६४ वा मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा

डॉ. प्रमोद चौधरी यांना जीवनगौरव पुरस्कार

प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, पं. भुवनेश्वर कोमकली, संकर्षण, स्पृहा, योगेश सोमण यंदाचे आकर्षण

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री मयुरेश्वर अवतार श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांच्या ४६४ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन यंदा ६ ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान संजीवन समाधी मंदिर आणि श्री मंगलमूर्ती वाडा, चिंचवड येथे भव्य उत्साहात करण्यात आले आहे. यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘इथेनॉल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांना ‘श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार असून, प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, योगिता गोडबोले, संदीप उबाळे आणि पं. भुवनेश कुमार कोमकली यांच्या गायनाची पर्वणी रसिकांना अनुभवता येणार आहे. याचबरोबर संकर्षण आणि स्पृहा यांच्या विशेष कार्यक्रमांसह योगेश सोमण यांचा ‘आनंदडोह’ हा बहुप्रतीक्षित सांस्कृतिक कार्यक्रमही यावर्षी मोठे आकर्षण ठरणार आहे.

शनिवार, ६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता या सोहळ्याचे उद्घाटन मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री तसेच सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त व प्रशासक श्रावण हर्डीकर, तसेच सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. खासदार श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार शंकर जगताप, महेशदादा लांडगे, उमाताई खापरे, अमित गोरखे आणि बापूसाहेब पठारे हे मान्यवरही सोहळ्यात सहभागी होणार आहेत. याशिवाय संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान (आळंदी) चे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ आणि जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान (देहू) चे मुख्य विश्वस्त जालिंदर महाराज मोरे यांचीही उपस्थिती सोहळ्याची शोभा वाढवणार आहे, अशी माहिती मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस आणि ॲड. देवराज डहाळे तसेच माजी महापौर र अपर्णा डोके, माजी नगरसेवक सुरेश भोईर, मोरेश्वर शेडगे, अश्विनी चिंचवडे आदी उपस्थित होते.

यापुढे दर संकष्टी चतुर्थीला पवनामाईची आरती सुरू करण्यात येणार आहे. पर्यावरण व नदी विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

उद्घाटनापूर्वी श्री नितीन दैठणकर यांचे सनईवादनाने परिसर भक्तिरसाने न्हाऊन निघणार आहे. पाचही दिवस सकाळी ६.०० वाजता सनई चौघडा वादन आणि सकाळी ८.३० वाजता श्री मोरया गोसावी महाराज ओवीबद्ध चरित्र पठण होणार आहे. या सोहळ्यातील प्रमुख धार्मिक विधींमध्ये रविवार, ७ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठण, सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत होणारा सामुदायिक महाभिषेक आणि वैदिक पद्धतीने संपन्न होणारे मन्युसुक्त हवन यांचा समावेश आहे.

सोहळ्यादरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबतच समाजोपयोगी उपक्रमांनाही विशेष महत्त्व दिले गेले आहे. ७ आणि ८ डिसेंबर रोजी आरोग्य, दंत व नेत्र तपासणी शिबिरे, तसेच रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय ९ डिसेंबर रोजी सकाळी ‘सोहम योग साधना मंडळा’तर्फे योग वर्ग आयोजित करण्यात आला आहे.

रात्रीच्या सांस्कृतिक सत्रात कला, साहित्य आणि संगीताची पर्वणी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. योगिता गोडबोले आणि संदीप उबाळे यांचे सुगम संगीत, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांचा ‘मर्मबंधनातली ठेव’ कार्यक्रम, तसेच पं. भुवनेशकुमार कोमकल्ली यांचे उपशास्त्रीय गायन होणार आहे. सोमवार, ८ डिसेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे ‘सध्याचा सामर्थ्यशाली भारत’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. याचबरोबर संकर्षण–स्पृहा यांचे विशेष सादरीकरण आणि योगेश सोमण यांचा ‘आनंदडोह’ हा कार्यक्रमही खास आकर्षण ठरणार आहे.

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असलेला ‘महासाधू श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार’ मंगळवार, ९ डिसेंबर रोजी सायंकाळी डॉ. प्रमोद चौधरी यांना ज्येष्ठ उद्योजक अभय फिरोदिया यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

बुधवार, १० डिसेंबर (मार्गशीर्ष वद्य षष्ठी) रोजी सोहळ्याची सांगता होईल. पहाटे ४.३० वाजता श्रींच्या संजीवन समाधीची महापूजा मंदार महाराज देव व चिंचवड ब्रह्मवृंद यांच्या हस्ते संपन्न होईल. सकाळी ७ वाजता पुष्पवृष्टी, नगारखाना आणि केरळी वाद्य पथकासह नगरप्रदक्षिणा निघेल. त्यानंतर सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत ह.भ.प. प्रमोद महाराज जगताप (बारामती) यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे कीर्तन होईल. दुपारी १२ वाजल्यापासून सर्व भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी मानवंदना ढोलताशा पथक, गंगा आरती आणि रात्री ८ वाजता भव्य आतषबाजीसह सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.

सर्व मोरया भक्तांनी या सोहळ्यास तन-मन-धनाने सहकार्य करून श्री मोरया चरणी सेवा रुजू करावी आणि हा भक्तिसोहळा अधिक यशस्वी करावा, असे आवाहन मुख्य विश्वस्त श्री मंदार जगन्नाथ देव महाराज, तसेच विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. राजेंद्र उमाप आणि ॲड. देवराज डहाळे यांनी केले आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleदिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी महापालिका कटिबद्ध—तृप्ती सांडभोर
Next Article दापोडी–पिंपळे सौदागर–वाकड पट्टा असुरक्षित; नागरिकांच्या संरक्षणासाठी फायर स्टेशन उभारा – नाना काटे”
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.