ताज्या घडामोडीपिंपरी

कलागुणांचा सन्मान! अमृता पोपट अरणे हिला सर्वधर्मसमभाव सत्कार

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास भाऊ कदम यांचे आकर्षक स्केच उत्तम कलात्मकतेने साकारल्याबद्दल चित्रकार अमृता पोपट अरणे हिचा सर्वधर्मसमभाव भव्य सत्कार करण्यात आला. हा सत्कार मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

अमृता अरणे हिच्या कलाकृतीतून समाजातील एकता, सौहार्द आणि सकारात्मकतेचा संदेश प्रभावीपणे व्यक्त झाला असल्याचे मान्यवरांनी यावेळी गौरवले. राष्ट्रीय लोक अदालत पॅनल न्यायाधीश रमेश अण्णा उमरगे यांनी या प्रसंगी अमृता हिला शुभेच्छा देत तिच्या पुढील कलाजिवनासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

कलाप्रेमी व उपस्थित मान्यवरांनी या निमित्ताने अमृता अरणेच्या सर्जनशीलतेचे कौतुक केले आणि तिच्या कलाकृतीतून सामाजिक ऐक्याचा सुंदर संदेश दिल्याबद्दल अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button