पिंपरी-चिंचवडमधील मुख्य रस्ते व पुलांची स्ट्रक्चरल ऑडिट

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य रस्ते व नदीवरील पुलांचे आयुष्यमान किती झाले आहे. ते पूल धोकादायक आहेत का, त्यांची बांधकाम तपासणी महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे.
शहरातील भाग एकमेकांना जोडण्यासाठी तसेच, वाहतूक रहदारी सुरक्षित व्हावी म्हणून महापालिकेने मुख्य रस्त्यावर उड्डाण पुल आणि पवना, इंद्रायणी व मुळा नदी पात्रावर पुल बांधले आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. ते पुल धोकादायक आहे का, हे तपासण्यासाठी महापालिका मुख्य रस्त्यांवरील उड्डाण पुल आणि नदीवरील पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार आहे.
त्या कामासाठी स्थापत्य विभागाने 21 जुलैला निविदा काढून सल्लागारांकडून दर मागविले होते. त्यात सहा सल्लागारांनी सहभाग घेतला. त्यानुसार अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या दालनात 29 जुलैला सल्लागारांनी सादरीकरण केले. सल्लागारांकडून तांत्रिक प्रस्ताव घेण्यात आले. त्यात पात्र ठरलेल्या 3 सल्लागारांची निवड करण्यात आली. त्यात सर्वांधिक गुण केबीपी सिव्हील इंजिनिअरींग सर्व्हेिसेसची निवड करण्यात आली. त्यासाठी त्या सल्लागार एजन्सीने 3 कोटी 34 लाख 50 हजार रूपयांचा दर दिला आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती मान्यता दिली आहे.
श्री संत तुकाराम महाराज पुलासाठी 97 लाखांचा खर्च
महापालिकेच्या श्री संत तुकाराम महाराज पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्यासाठी स्ट्रक्चरोनिक्स कन्सल्टींग इंजिनिअर्स या सल्लागार एजन्सीची निवड करण्यात आली. त्यासाठी त्या एजन्सीला 97 लाख रूपये शुल्क देण्यात येणार आहे. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समिती मान्यता दिली आहे.













