ताज्या घडामोडीपिंपरी

उन्नती तर्फे भव्य दांडिया ग्रुप डान्स स्पर्धा उत्साहात संपन्न : भारतीय संस्कृतीचा अविस्मरणीय जल्लोष

Spread the love
 पिंपळे सौदागर,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  उन्नती सोशल फाउंडेशन आयोजित भव्य दांडिया ग्रुप डान्स स्पर्धा मोठ्या उत्साहात व सांस्कृतिक जल्लोषात संपन्न झाली. स्व. बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण, पिंपळे सौदागर येथे दिनांक ५ ते ७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान सायंकाळी ६.०० ते १०.०० या वेळेत झालेल्या या तीन दिवसीय स्पर्धेमध्ये तब्बल ४० ग्रुप्सनी सहभाग नोंदविला. प्रत्येक ग्रुपने सादर केलेल्या पारंपरिक व आधुनिक नृत्यरचनांनी उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
या स्पर्धेमध्ये प्रत्येक सहभागी ग्रुपला रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ मनोरंजनापुरती दांडिया संध्याकाळ न ठेवता, त्याला स्पर्धात्मक व सांस्कृतिक अधिष्ठान देण्याचा प्रयत्न उन्नती सोशल फाउंडेशनने केला.
या प्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. (सौ.) कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “आज अनेक ठिकाणी दांडिया संध्याकाळ आयोजित केल्या जातात, परंतु त्यामध्ये फक्त डीजे आणि गोंगाट एवढ्यापुरतेच मर्यादित स्वरूप राहते. मात्र उन्नती सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही या दांडिया कार्यक्रमाला स्पर्धात्मक रूप दिले आहे. सहभागी ग्रुप्सना सन्मानपूर्वक गौरविले जाते, रोख पारितोषिके दिली जातात आणि प्रशस्तीपत्रक देऊन त्यांचा सन्मान केला जातो. या उपक्रमातून देशातील विविध संस्कृती, पारंपरिक नृत्यशैली आणि लोककला एकत्र येऊन भारतीय संस्कृतीचे एक सुंदर दर्शन घडते.”
चिंचवड विधानसभेचे कार्यसम्राट मा. आमदार श्री. शंकरभाऊ जगताप म्हणाले, “उन्नती सोशल फाउंडेशनने सांस्कृतिक क्षेत्रात घेतलेली ही पुढाकारपुर्ण पावले म्हणजे समाजातील एकात्मतेचे दर्शन आहे. तरुण पिढीला संस्कृतीशी जोडून ठेवण्याचे हे उत्तम माध्यम ठरते.”
मावळ लोकसभेचे खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे म्हणाले, “अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. युवकांना त्यांची कला सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते हे अत्यंत स्वागतार्ह आहे.”
हरिभक्त परायण प.पू. भाषाप्रभू पंकज महाराज गावडे यांनी आपल्या आशीर्वचनात सांगितले, “दांडिया हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नसून, तो भक्ती, संस्कृती आणि आनंदाचा संगम आहे. उन्नती सोशल फाउंडेशनने समाजाला एकत्र आणणारा, संस्कार जपणारा उपक्रम राबविला आहे.”
या तीन दिवसीय दांडिया स्पर्धेत अभिनेत्री रत्ना दहिविलकर, सुप्रसिद्ध गायक, संगीतकार, गीतकार व अभिनेते अवधूत गांधी यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या कलात्मक सादरीकरणाने कार्यक्रमाची शोभा वाढविली.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले. हजारो नागरिकांनी उपस्थित राहून या दांडिया उत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.
याप्रसंगी , खासदार श्रीरंग आप्पा बारणे , आमदार शंकरभाऊ जगताप , उद्योजक विजय पांडुरंग जगताप , माजी नगरसेविका निर्मला कुटे , जयनाथ काटे , पी.के. स्कूलचे संस्थापक जगन्नाथ आप्पा काटे , आंतरराष्ट्रीय कब्बडी पंच दत्ता झिंजुर्डे सामाजिक कार्यकर्त्या अनिता काटे , राजू शेलार , अतुल पाटील , सरचिटणीस भाजपा ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश मनोज ब्राह्मणकर , शरद कुटे , संतोष काटे , उल्हास मेटे , शंकर चौंधे , जिल्हाध्यक्ष भाजपा पिंपरी चिंचवड सांस्कृतिक प्रकोष्ट पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) विजय भिसे , राजू भिसे (चेअरमन, ऑस्टिन रिअ‍ॅलिटी) यांच्यासह विठाई वाचनालय चे सभासद , आनंद हास्य क्लब चे सभासद ,ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशनचे सर्व सभासद , लिनिअर गार्डन जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक बंधू-भगिनी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button