रहाटणीत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा!

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – 17 सप्टेंबर, हा दिवस मराठवाड्याच्या हैदराबाद संस्थानातून मुक्तीचा स्मरणदिन आहे. 1948 मध्ये भारतीय सैन्याने ऑपरेशन पोलोद्वारे निजामाच्या रझाकारी अत्याचारातून मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. या लढ्यात हजारो मराठवाड्यातील वीरांनी वीरमरण पत्करले. हा दिवस मराठवाड्याच्या स्वाभिमानाचे आणि बलिदानाचे प्रतीक आहे, जो दरवर्षी उत्साहाने साजरा केला जातो.
यानिमित्ताने रहाटणीत मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी रहाटणी फाटा याठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाला स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर, रहाटणी-पिंपळे सौदागर भाजपा मंडल अध्यक्ष सोमनाथ तापकीर, संजय गांधी निराधार योजना चिंचवड विधानसभा अध्यक्ष नरेंद्र माने, सामाजिक कार्यकर्ते नरेश आप्पा खुळे, महाराष्ट्र शासन गुणवंत कामगार पुरस्कार विजेते बाळासाहेब साळुंके, विजय कांबळे, दीपक जाधव, ज्ञानेश्वर डोके, धोंडीराम कुंभार, त्रिमूख एलुरे, बाळासाहेब पवार, बबन शेगावे, धर्मवीर कामगार संघटनेचे संजय वाघमारे, प्रकाश पाचपिंडे, सतीश वाघमारे, अनिल पाचपिंडे, कैलास गायकवाड, प्रभाकर कदम, अशोक शिंदे, नरेश अंभोरे, यांच्यासह सर्व कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठवाडा मुक्तीसंग्रामातील शहीदांच्या बलिदानाला सलाम! 🙏













