प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथे कुणाल आयकॉन रोड वरील छत्रपती युवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जिरेटोप शिल्प उभारा – नाना काटे

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन रोड वरील छत्रपती युवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जिरेटोप शिल्प उभारण्यात यावे, अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्र. २८ रहाटणी पिंपळे सौदागर मध्ये महानगरपालिकेच्या वतीने अनेक लोकउपयोगी प्रकल्प राबविले आहेत सुसज्य रस्ते, उद्यान, क्रीडांगणे, शिल्प व इतर प्रकल्प साकारण्यात आले असून, त्यानुसार महानगरपालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागामार्फत कुणाल आयकॉन रोड हा अत्याधुनिक पद्धतीने विकसित करण्यात येत असून रस्त्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे.
या कुणाल आयकॉन रोड वरील छत्रपती युवा चौक परिसरात येथे लहान मोठ्या खाजगी शाळा आहेत. अनेक सोसायट्या देखील या रोडवर आहेत. नागरिक देखील या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात, वाहतुकीचे पालन व्यवस्थित होईल या दृष्टीने, चौक सुशोभीकरण अंतर्गत आयुक्त वरील विषयास अनुसरून पिंपळे सौदागर मधील कुणाल आयकॉन रोड वरील छत्रपती युवा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे जिरेटोप असणारे शिल्प उभारण्यात यावे असे ही निवेदनात म्हटले आहे.













