ताज्या घडामोडीपुणे

आयआयएमएसमध्ये आयबीएमच्या डेटा सायन्स अभ्यासक्रमाला सुरुवात

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स म्हणजेच आयआयएमएसमध्ये संगणक तंत्रज्ञानातील जगप्रसिद्धआयबीएम कंपनीच्यावतीनं डेटा सायन्स अभ्यासक्रमाला सुरवात करण्यात आली.

आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांच्या मार्गदर्शनानुसार संस्थेतील बीसीए, बीबीए आणि एमसीए विद्याशाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आला आहे.

यामध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अनुकूल असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग आधारित डेटा सायन्सच्या विविध आधुनिक प्रगत तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यावेळी आयबीएमचे प्रशिक्षक साहिल टोंगळे यांनी विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील करिअरच्या संधींबद्दल मार्गदर्शन केले.

यावेळी रोजगार आणि नोकरीच्या संधीच्या स्पर्धेत सक्षमपणे टिकाव लागण्यासाठी युवा पिढीने या इमर्जिंग टेक्नॉलॉजीचा अंगीकार करणे आवश्यक आहे असे मत प्रा. प्रशांत वाडकर यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी एमसीए विभाग प्रमुख प्रा.डॉ.अश्विनी ब्रह्मे यांनी या अभ्यासक्रमाबद्दल सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांना उद्योगजगताभिमुख या प्रशिक्षणाचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन केले. तर लेखा दीक्षित या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button