चिंचवडताज्या घडामोडीशिक्षण

विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा – व्यावसायीक अमरीश कक्कड

Spread the love

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, मधील प्रतिभा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज (सीबीएसई) प्रतिभा इंटरनॅशनल स्कूल, व प्रतिभा शिक्षणशास्त्र महाविद्यालयात ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण प्रख्यात व्यावसायिक अमरीश कक्कड यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उपस्थितांनी समुह राष्ट्रगीताचे सादरीकरण करून भारतमाताकी जयच्या धोषणा दिल्या . श्री कक्कड याचा सत्कार संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते सन्मानपूर्वक करण्यात आला . यावेळी व्यासपीठावरती कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ.भूपाली शहा , संचालिका डॉ . तेजल शहा , प्रभारी प्राचार्या डॉ. क्षितीजा गांधी , मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ.राजेंद्र कांकरिया, पी.आय.बी.एम.चे संचालक डॉ.सचिन बोरगावे, प्राचार्य डॉ.पौर्णिमा कदम, , डॉ. वनिता कुर्‍हाडे, वृंन्दा जोशी उपस्थित होते .

महाविद्यालयाच्या प्रांगणात शाळेच्या उपप्राचार्या लीजा सोजू, समन्वयीका गुलनाज खान यांच्या मार्गदर्शनाखाली १३० हून अधिक शालेय विद्यार्थ्यांनी सैनिकी वेशभूषा परिधान करून बँड पथका समवेत नेत्रदीपक परेड करीत उपस्थितांना मानवंदना दिली. माजी सैनिक रमेश वराडे , एस.एम. भगवान उत्तेकर यांनी विशेष परीश्रम घेतले .यावेळी पालक, विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रख्यात व्यावसायीक अमरीश कक्कड यांच्या हस्ते महाविद्यालयात विशेष नैपुण्य मिळविलेले प्राध्यापक, शिक्षक, खेळाडू, गुणवंत विद्यार्थ्यांना भेटवस्तू देत त्याचा गुणगौरव करण्यात आला. क्वीक हील फोंन्डेशनच्या सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा या सामाजिक उपक्रमाच्या प्रकल्प समन्वयीका महाविद्यालयातील डॉं. हर्षिता वाच्छानी यांच्या नेतृत्वात सायबर वॉरियर्स पथकातील विद्यार्थी समाजातील सायबर सुरक्षेच्या आव्हानांना सामोरे कसे जायचे याबाबत जनजागृती करतात. त्यानी स्वातंत्र दिनाचे औच्यीत्य साधत उपस्थितांना या वेळी शपथ दिली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योजक व प्रख्यात व्यावसायीक अमरीश कक्कड मार्गदर्शन करताना आपल्या स्वातंत्र्य सैनिकाच्या शौर्याचा उल्लेख करीत पुढे म्हणाले , देशाच्या प्रगतीसाठी शिक्षक व विद्यार्थी, नागरीक महत्वाची भूमिका बजावत असले तरी , त्यात युवकांची नैतिक जबाबदारी जास्त आहे . आजच्या दिवशी फक्त ध्वज फडकविणे एवढेच काम आपले नसून त्याचबरोबर आपल्यावर एक जागरूक नागरिक म्हणून अनेक जबाबदाऱ्या देखील आहेत . विद्यार्थ्यांनो फक्त झोपेत स्वप्न बघू नका, त्यासाठी प्रत्यक्षात प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे . आज पर्यावरणाचा ऱ्हास आणि वाढते प्रदूषण याला आळा घालण्यासाठी सामुहिकरीत्या पुढाकार घेणे हे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवण्या साठी प्रथम आपल्या घरापासून सुरुवात करावी असे आवाहन करून प्रत्येकाने देशाच्या विकासासाठी योगदानातही सक्रिय सहभागी व्हावे असे शेवटी आवाहन केले.

कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ.दीपक शहा आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले, आपला भारत देश तंत्रज्ञानात आज पुढे आहे . त्यासाठी अनेकांनी कष्ट केले .विविध क्षेत्रात देखील पुढे जात आहे . त्यासाठी अनेकांचे योगदान देखील आहे. आज देशाच्या प्रगतीसाठी सामूहिक योगदानाची आवश्यकता आहे. आपला भारत देश स्वातंत्र झाला यावर आपण खुष न रहाता जागतिक पातळीवर विकसित भारत देश प्रत्यक्षात नावारूपाला येण्यासाठी प्रत्येकाने आपल्या जबाबदाऱ्या ओळखून प्रत्येक घटकांने एकदिलाने , एकजुटीने , प्रत्येकांचे स्वातंत्र्य अबाधीत ठेवत देशाच्या सर्वागीण प्रगतीसाठी हातभार लावू शकलो तर सर्वाचे स्वप्न पूर्ण होतील . असा विश्वास यावेळी त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ . सुवर्णा गायकवाड यांनी केला . पाहुण्याचा परीचय प्रा. मनीषा पाटील यांनी तर आभार प्रा. पल्लवी चव्हाण यांनी मानले . ध्वजारोहणासाठी डॉ. आनंद लुंकड, प्रा.पांडुरंग इंगळे, प्रा. शबाना शेख , डॉ. अभय पोद्दार, संदीप शहा यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button