चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयात 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजी राजे माध्यमिक विद्यालयात 79 वा स्वातंत्र्यदिन सोहळा मोठ्या दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रमेश साळवे, इस्रोचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अरुण कुमार सिन्हा, उद्योजक श दर्शन धामणकर साहेब,
विद्यालयाचे अध्यक्ष जगदीश जाधव, सचिव संजय जाधव, संचालक विजय जाधव , उपाध्यक्ष अमित बच्छाव साहेब, त्याचप्रमाणे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचे प्रमुख डॉक्टर दिलीप देशमुख , महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सहाय्यक लेखाधिकारी अनिल लोंढे साहेब, उद्योजक राजशेखर चावला साहेब, मावळचे माजी सरपंच एकनाथ शिर्के, उपसरपंच अनंता घुले, त्याचप्रमाणे पालक संघाचे अध्यक्ष ऍडवोकेट युवराज गटे, पालक संघाचे सदस्य रवींद्र बिरादार, डॉक्टर बागले मॅडम उपस्थित होते.
प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी आदर्श विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कुमारी तनिष्क हिरे हिने आपले मनोगत सादर केले. त्याप्रमाणे मान्यवरांच्या मनोगतामध्ये माननीय डॉक्टर दिलीप देशमुख साहेब यांनी विद्यार्थ्यांना भविष्यकालीन शिक्षण क्षेत्रातील उच्च शिक्षण घेतल्यानंतर येणाऱ्या संधी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे इस्रोचे शास्त्रज्ञ डॉक्टर अरुण कुमार सिन्हा यांनीदेखील विद्यार्थ्यांना सायन्स क्षेत्रामध्ये इसरो मध्ये विद्यार्थ्यांना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याची माहिती करून दिली. तसेच प्रमुख अतिथी रमेश साळवे साहेब यांनी विद्यालयातील सर्व शैक्षणिक व भौतिक सुविधांची पाहणी करून संस्थेने विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व शैक्षणिक व भौतिक सुविधांचा तसेच राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा गौरव केला.
सदर प्रसंगी उपस्थित विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळाराम पाटील, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पा शिंदे, उपमुख्याध्यापिका सौ सुषमा संधान पर्यवेक्षक साहेबराव देवरे, कोअर कमिटी सदस्या मनीषा जाधव, छाया ओव्हाळ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडाशिक्षक शब्बीर मोमीन यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव यांनी केले, तर आभार प्रदर्शन उपमुख्याध्यापिका सुषमा संधान यांनी केले.















