“रक्षाबंधन निमित्त महिलांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनोखा आदर – माजी नगरसेवक सुरेश भोईर यांच्या पुढाकाराने हजारो राख्यांचा उपक्रम”

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड प्रभाग क्रमांक 18 येथील माजी नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी रक्षाबंधनाच्या शुभ अवसराचे औचित्य साधून एक आगळा-वेगळा उपक्रम राबवला. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बंद लिफाफ्यातून एक हजारांहून अधिक राख्या पाठवण्यात आल्या.
या उपक्रमामध्ये भाग घेणाऱ्या अनेक महिलांनी मुख्यमंत्र्यांनी महिलांच्या सन्मान, सुरक्षितता आणि कल्याणासाठी घेतलेल्या विविध सकारात्मक आणि प्रभावी निर्णयांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. महिलांच्या सुरक्षेसाठी उभारलेल्या यंत्रणा, सक्षम कायदे आणि महिलांना केंद्रस्थानी ठेवून चालवलेल्या योजनांचे त्यांनी विशेष कौतुक केले.
या राख्यांमधून महिलांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना एक बंधन – सन्मानाचे, विश्वासाचे आणि सुरक्षिततेचे – बांधले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.माजी नगरसेवक सुरेश भोईर यांनी या उपक्रमाचे आयोजन करून महिलांच्या भावना पोहोचवण्याचे कार्य प्रभावीपणे पार पाडले असून, रक्षाबंधनाचा खरा अर्थ या माध्यमातून उलगडला आहे.
या अनोख्या सामाजिक उपक्रमामुळे प्रभागात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, हा उपक्रम इतर लोकप्रतिनिधींनाही प्रेरणा देणारा ठरू शकतो.













