ताज्या घडामोडीपिंपरी
‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ अभियानांतर्गत संपूर्ण शहरातील नागरिकांना मोफत तिरंगा वितरित करण्याची युवा नेते दिनेश यादव यांची मागणी

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वातंत्र्य दिन १५ ऑगस्ट २०२५ निमित्त भारत सरकारच्या सूचनेनुसार ‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ हे जनजागृती अभियान संपूर्ण देशभर राबवले जात आहे. या अभियानात पिंपरी चिंचवड महापालिकेचाही सक्रीय सहभाग अत्यावश्यक आहे.
या अभियानाचा उद्देश प्रत्येक नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागवणे व स्वच्छतेबाबत सजगता निर्माण करणे हा आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरावर तिरंगा अभिमानाने फडकवावा, यासाठी महापालिकेच्या वतीने संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना मोफत तिरंगा वितरित करण्यात यावा.
सदर उपक्रमासाठी तात्काळ आवश्यक नियोजन करून, सर्व प्रभाग कार्यालयांमार्फत मोफत तिरंगा वाटपाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.








