चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये १०जुन रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला. या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदनेने झाली. विद्यार्थ्यांनी गुरुंच्या महत्त्वावर भाषण, गाणी, कविता आणि योग नृत्य सादर केले. काही विद्यार्थ्यांनी गुरुवंदना गीत गायले. शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल मनोगत व्यक्त केले.
शाळेच्या उपसंचालिका अनिता काटे यांनी विध्यार्थ्यांना संभोधित करताना आपल्या आयुष्यात गुरूंचे किती महत्व आहे हे पटवून दिले. त्याच बरोबर “गुरु हे तेच असतात जे आज्ञानाचा अंधार दूर करून आपल्याला आत्मज्ञानाकडे नेतात” हा संदेश त्यांनी दिला.
त्याचबरोबर शाळेचे संचालक श्री संदीप काटे सरांनी आपल्या भाषणातून गुरूंचे जीवनातील स्थान स्पष्ट करून विद्यार्थ्यांना सदैव गुरूंचा आदर करण्याचे महत्त्व सांगितले.
हा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.













