ताज्या घडामोडीपिंपरी
शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग व तिरूमला सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग व तिरूमला सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक 11 मधील दहावी व बारावी च्या शालेय परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमास काँग्रेसचे ज्येष्ठ काम ज्येष्ठ नेते कामगार नेते विष्णुपंत नेवाळे शिक्षण मंडळ उपसभापती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या क्रीडा विभागाच्या स्मिता गोरे, प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे उपाध्यक्ष रवींद्र जांभळे यांनी चे माजी प्रांताध्यक्ष मनोज कांबळे,शिक्षण मंडळाचे सभापती अभिमन्यू दैतुले, महादेव खाडे, मिलिंद फडतरे आदी उपस्थित होते.
फाउंडेशनच्या माध्यमातून 90 मुलांचा सत्कार करण्यात आला.भविष्यामध्ये या फाउंडेशनच्या माध्यमातून सत्कार समारंभाचे नियोजन केले जाईल.तळागाळातील दहावी बारावीचे गुणवंत विद्यार्थ्यांना मृत्यू मिळावी या उद्देशाने फाउंडेशन सतत कार्यरत राहील. फाउंडेशनच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, रक्तदान शिबिर, हळदीकुंकवाचे कार्यक्रम असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात.












