ताज्या घडामोडीपिंपरी

रस्त्यावर पडलेले झाड हटवत वाहतूक केली सुरक्षित पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाची तत्परता

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने मंगळवार (२४ जून) रोजी चिंचवड परिसरातील एका रस्तावर पडलेले झाड हटवत अवघ्या काही वेळात रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला आहे. या मोहिमेदरम्यान एक प्रशिक्षणार्थी जवान किरकोळ जखमी झाला आहे.

चिंचवड परिसरात चिंचवड स्टेशनच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास झाड कोसळले होते. त्यामुळे या रस्त्यावरील दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आकुर्डी प्राधिकरण उपअग्निशमन केंद्राच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. या पथकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चेन सॉच्या साहाय्याने झाड व्यवस्थित कापून बाजूला हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. प्रमुख अग्निशामक विमोचक संजय महाडीक यांच्या नेतृत्वाखाली यंत्रचालक विजय चव्हाण, प्रशिक्षणार्थी जवान शिवम चव्हाण, सूरज माने, राहुल जाधव, संचित पाटील यांनी ही कामगिरी केली. यावेळी प्रशिक्षणार्थी जवान शिवम चव्हाण झाडाच्या फांद्या हलवत असताना किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले.

रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे तातडीने झाड हटवण्याचे काम सुरु केले. हे काम करीत असताना माझ्या पायाला थोडी दुखापत झाली. पण नागरिकांना आपत्कालीन परिस्थिती सेवा देणे, ही आमची जबाबदारी आहे.
– शिवम चव्हाण, प्रशिक्षणार्थी जवान, पिंपरी चिंचवड महापालिका

अग्निशमन दलातील जवानांच्या निःस्वार्थ सेवाभावाचे जिवंत उदाहरण म्हणजे ही घटना आहे. प्रशिक्षणाच्या टप्प्यावर असतानाही शिवम चव्हाण यांनी आपल्या कर्तव्यात कसूर न करता नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य दिले. अग्निशमन विभागात काम करणारा प्रत्येक जवान ह निष्ठा, तत्परता आणि जबाबदारीचे प्रतीक आहे.

– मनोज लोणकर, सह आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button