ताज्या घडामोडीपिंपरी

सामाजिक कार्यकर्ते भगवानराव मुळे यांचे आकस्मित निधन

Spread the love

 

शाहूनगर ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाहूनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते भगवानराव तुकाराम मुळे (वय : ६३वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आकस्मित निधन झाले.

साई मित्र मित्र मंडळाचे मुख्य विश्वस्त म्हणून ते कार्यरत होते. परिसरात “एक गाव एक गणपती” हा उपक्रम सुरू करून सर्व सामाजिक संस्थांचा सहभाग वाढवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अखिल शाहूनगर नवरात्र महोत्सव, आई महोत्सव, मातोश्री व्याख्यानमाला, भागवत कथा महायज्ञ, साईधाम शिर्डी पायी दिंडी सोहळा, विविध मंडळांचे अन्नदान सोहळे यामध्ये ते हिरीरीने सहभागी होत असत. एक मनमिळाऊ व्यक्ती म्हणून सर्वपरिचित असणाऱ्या आणि सेवा, समन्वय व साहचर्य याचे तरुणांना मार्गदर्शन करणाऱ्या कार्यकार्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा अंत्यविधी मुळेवाडी (मंचर) ता. आंबेगाव येथे पार पाडला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button