Close Menu
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram
Facebook X (Twitter) Instagram
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»३० जून २०२५ पर्यंत संपूर्ण कर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरल्यास मिळणार १०% सूट आणि इतर कर सवलती
ताज्या घडामोडी

३० जून २०२५ पर्यंत संपूर्ण कर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे भरल्यास मिळणार १०% सूट आणि इतर कर सवलती

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com19 April 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ करिता नेहमीप्रमाणे मालमत्ता कर सवलतीच्या विविध योजना जाहीर केल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात ६ लाख १५ हजार ८६३ मालमत्ता असून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये जास्तीत जास्त कर संकलन करण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन सुरू केले आहे. नागरिकांना कराचा घरबसल्या भरणा करता यावा, यासाठी ऑनलाइन सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरल्यास ५ टक्के आणि तो ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने भरला तर अधिक ५ टक्के अशी एकूण १० टक्के सवलत मिळणार आहे.

या सवलतीचा लाभ घेऊन आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये पहिल्या तिमाहीमध्ये ३ लाख ४९ हजार ८३८ मालमत्ताधारकांनी ४३५ कोटी मालमत्ता कर वेळेत भरला आहे. सबब या सवलतींचा लाभ घेऊन मालमत्ताधारकांनी लवकरात लवकर ऑनलाईन पद्धतीने आपला कर भरावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वर नमूद कर सवलती व्यतिरिक्त महानगरपालिकेतर्फे करदात्यासाठी अन्य विविध सवलती जाहीर केल्या आहेत. महानगरपालिका हद्दीत महिलांच्या नावावर असलेल्या निवासी मालमत्तेवर सामान्य करात ३० टक्के, दिव्यांगांना ५० टक्के व माजी सैनिकांना मालमत्ता करात १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सवलतींचा लाभ ३० जून २०२५ पर्यंत घेता येणार आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ज्या महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांनी या सवलतींचा लाभ घेतला आहे, त्यांना आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये सवलतींचा लाभ घेण्यासाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही.

अशी आहे मालमत्ता कर सवलत योजना

– ३० जून २०२५ पर्यंत आगाऊ तसेच ऑनलाईन मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी १० टक्के सवलत

– फक्त महिलांच्या नावावर असलेल्या निवासी मालमत्तेस ३० टक्के कर सवलत

– ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधिर व मूकबधिर यांच्या नावावर असणाऱ्या मालमत्तेस ५० टक्के सवलत

– ग्रीन बिल्डिंग रेटिंगमध्ये ३ ते ५ रेटिंग असणाऱ्या मालमत्तांना ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत सवलत

– कंपोस्टींग यंत्रणा, एसटीपी प्लांट, झिरो वेस्ट संकल्पना राबविणाऱ्या निवासी मालमत्तांना सामान्य करात ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत सवलत

– शैक्षणिक इमारतींमध्ये ऑनसाईट कंपोस्टिंग, झिरो वेस्ट, झिरो वेस्ट रेनवॉटर हार्वेस्टिंग, झिरो वेस्ट सौर ऊर्जा यासंकल्पना राबवणाऱ्या मालमत्तांना सामान्य करात ४ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत सवलत

– शौर्य पदक धारक व माजी सैनिक, विधवा पत्नी, अविवाहित शहीद, सैनिक यांना मालमत्ताकरात १०० टक्के सवलत

– सलग तीन वर्षे मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ता धारकांना सामान्य कर रकमेवर २ टक्के सवलत

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने २०२५-२६ या वर्षाकरिता मालमत्ता करामधील सवलत व सूट जाहीर केल्या आहेत. या मालमत्तांची बिले देखील ऑनलाइन जनरेट झाली आहेत. ३० जून २०२५ पर्यंत ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्यांना किमान दहा टक्के सामान्य करावर सवलत मिळणार आहे. ३० जून २०२५ पर्यंत कर भरून विविध कर सवलीतीचा लाभ घेता येणार असल्यामुळे जास्तीत जास्त मालमत्ताधारकांनी आपला कर ३० जून पूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरून या सवलतींचा लाभ घ्यावा.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये मालमत्ता कर वेळेत भरून सवलतींचा लाभ घेतला, ज्यामुळे ९६६ कोटी रुपयांचा महसूल वसूल करण्यात महापालिकेला यश मिळाले. यावर्षीही करदात्यांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. या सवलतींचा लाभ घेण्यासाठी मालमत्ता कर लवकर भरावा.
– प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleविनीयार्ड वर्कर्स चर्च, दापोडी येथे गुड फ्रायडे उत्साहात साजरा
Next Article पिंपळे गुरवच्या माऊली जगताप आणि सहकाऱ्यांनी सात दिवसांत फत्ते केला एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
चिंचवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

By maharashtrabreakingnews.com4 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती…

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

श्री वैश्य सुतार पुणे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

POPULAR COMPANIES
  • Home
  • About
  • Team
  • पुणे
  • भोसरी
  • Buy now!
About Us
About Us

Your source for the lifestyle news. This demo is crafted specifically to exhibit the use of the theme as a lifestyle site. Visit our main page for more demos.

We're accepting new partnerships right now.

Email Us: info@example.com
Contact: +1-320-0123-451

Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021
New Comments
    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    • ताज्या घडामोडी
    • पिंपरी चिंचवड
      • भोसरी
    • देहू
    • आळंदी
    • पुणे
      • मावळ
      • शिरूर
      • हिंजवडी
    • महाराष्ट्र
    • देश – विदेश
    • राजकारण
    • क्राईम
    • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
    • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • सांस्कृतिक
    • जाहिरात विभाग
    • आरोग्य
    • धार्मिक
    • आरोग्य
    • क्रीडा
    • नवरात्री विशेष
    • व्हिडिओ
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.