ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरीमधील महावितरणच्या दोन उपकेंद्रांना‘आयएसओ’चे मानांकन

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महावितरणच्या पुणे परिमंडल अंतर्गत आणखी दोन उपकेंद्रांनी ‘आयएसओ ९००१:२०१५’चे मानांकन मिळविले आहे. पिंपरी विभागातील गणेशम् स्विचिंग स्टेशन व म्हाडा उपकेंद्राने मानांकनाचे निकष पूर्ण केल्याबद्द्ल मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार व ‘आयएसओ’चे परीक्षक श्री. नंदकुमार देशमुख यांच्याहस्ते या उपकेंद्रांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. आतापर्यंत पुणे परिमंडलातील नऊ उपकेंद्रांनी ‘आयएसओ’चे प्रमाणपत्र मिळविले आहे.

मोरवाडी येथे आयोजित कार्यक्रमात या दोन्ही उपकेंद्रांना ‘आयएसओ ९००१:२०१५’चे मानांकनाचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता श्री. सोमनाथ मुंडे यांची उपस्थिती होती. ‘आयएसओ’चे मानांकन मिळवून देण्यासाठी अतिरिक्त कार्यकारी अभियंते दिवाकर देशमुख, भुजंग बाबर, विश्वास भोसले, नितीन गायकवाड, सहायक अभियंता सुजित ननावरे व अनिल हुलसूरकर, जनमित्र संतोष खताळ, मधुकर भालेराव, नितीन काळे, संतोष हेगडे, अनिल फाळके, प्रवीण माळवदे, राजेश शेळके, अभिषेक गोरे आदींनी योगदान दिले.

सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्याची सेवा देण्यासाठी महावितरणचे उपकेंद्र व स्विचिंग स्टेशन्स अतिशय महत्त्वाचे आहेत. या उपकेंद्रांच्या आधुनिकीकरणासोबतच त्याची योग्य निगा, दर्जा व व गुणवत्ता अबाधित ठेवण्याचे निर्देश मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिले आहेत. त्याप्रमाणे पिंपरी विभाग अंतर्गत चिंचवड उपविभागातील २२/२२ गणेशम् स्विचिंग स्टेशन तसेच खराळवाडी उपविभागातील म्हाडा २२/११ केव्ही उपकेंद्रांनी ‘आयएसओ ९००१:२०१५’चे मानांकनासाठी तयारी सुरू केली होती. त्यासाठी आवश्यक निकषांनुसार या दोन्ही उपकेंद्रांची गुणवत्ता, कामकाजाचा दर्जा, सर्व प्रकारची सुरक्षा उपाययोजना व उपकरणांची उपलब्धता, पर्यावरण दस्ताऐवजीकरण, वैद्यकीय सुविधा, सुशोभीकरण आदी कामे करण्यात आली. ‘आयएसओ’च्या पथकांनी या दोन्ही उपकेंद्रांना नुकतीच भेट दिली व तब्बल २७ अटी व शर्तींच्या मानकांप्रमाणे तपासणी केली. यात हे उपकेंद्र ‘आयएसओ’च्या मानांकनासाठी पात्र ठरले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button