सध्या राजकारणाचा चिखल – राज ठाकरे
कुंभ मेळाव्याच्या मुद्द्यावर ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी आणि मिमिक्री करून हसविले


चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मनसेच्या पदाधिकारी बैठकीस काहीजण गैरहजर होते. मग मी त्यांची हजेरी घेतली. तर त्यांनी सांगितले, कुंभला गेला होतो. त्यावर मी त्यांना म्हटलो, करता कशाला पापं. आल्यावर आंघोळ केली ना? कुंभमेळ्याला जाऊन आल्यावर बाळा नांदगावकर यांनी मला कमंडलूमध्ये पाणी दिले.


ते म्हणाले, पिणार का? हड मी नाही म्हटले. देशातील एकही नदी स्वच्छ नाही, तरीही आम्ही नदीला माता म्हणतो. श्रद्धेला पण काही अर्थ आहे कि नाही, असे परखड मत मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. कुंभ मेळाव्याच्या मुद्द्यावर ठाकरे यांनि जोरदार फटकेबाजी आणि मिमिक्री करून हसविले.

आज असंख्य पक्षांना हा प्रश्न पडला आहे, यांचा खासदारकीला, आमदारकीला पराभव झाला तरीही या पक्षातील माणसं एकत्र कशी काय राहतात? फेरीवाले कष्ट करत असतात. पण आत्ताचे जे राजकीय फेरीवाले आलेत ना? तसे माझ्या पक्षात नाहीत. आज या फुटपाथवर, तिकडून डोळा मारला की त्या फुटपाथवर. आपण दुकान बांधू, फेरीवाले होणार नाही.
सध्या राजकारणाचा चिखल झाला आहे. राजकीय मते मिळवण्यासाठी आपापसात आगी लावत जात आहेत. मी १२ तारखेला प्रत्येकाला जबाबदारी देईल. प्रत्येक पदाधिकारी तुम्हाला देईन. सर्व गोष्टी तुम्हाला उघडपणे सांगता येणार नाही. ही संघटनात्मक गोष्ट आहे. याचे रिझल्ट निवडणुकीत दिसले पाहिजे. येत्या ३० तारखेला शिवतीर्थावर यावं”, असे आवाहन राज ठाकरेंनी केले.










