ताज्या घडामोडीपिंपरी

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास शहरातील राजकीय गणित बदलणारच!” – शहराध्यक्ष योगेश बहल”

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीचा घटक पक्ष असला तरी, स्थानिक स्तरावर स्वतंत्र लढण्याची मागणी ठामपणे पुढे येत आहे. दोन्ही राष्ट्रवादी गट स्थानिक स्तरावर एकत्र आले, तर कार्यकर्त्यांना त्यात समाधानच राहील, असे मत शहराध्यक्ष योगेश बहल यांनी व्यक्त केले.
या पत्रकार परिषदेस माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, अजित गव्हाणे,  भाऊसाहेब भोईर, मोरेश्वर भोंडवे,  विनायक रणसुभे,  काळुराम पवार, कैलास बारणे, सतीश दरेकर,राहुल भोसले, श्याम लांडे, कविता आल्हाट, संतोष बारणे, महेश झपके, राजेंद्र सिंग वालिया आदी उपस्थित होते.
सोमवारी नव्या शहर कार्यकारिणीच्या घोषणेनंतर पत्रकारांशी संवाद साधताना बहल म्हणाले, “महायुतीतील तीनही पक्ष एकत्र लढले, तर स्थानिक कार्यकर्त्यांना न्याय देणे कठीण होते. २०१७मध्ये भाजपच्या जागा जास्त होत्या. त्या परिस्थितीत राष्ट्रवादीच्या जागा कमी पडल्या. यंदाही तसेच समीकरण दिसत असल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीने स्वतंत्र लढावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे.”
बहल यांनी स्पष्ट केले की, दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या एकत्र येण्याबाबतचा अंतिम निर्णय वरिष्ठ नेतृत्त्व पातळीवर होईल. मात्र, “गटभेदाच्या वेदनेपेक्षा पक्षशक्ती मजबूत होणे महत्त्वाचे आहे. स्थानिक कार्यकर्त्यांना एकत्र काम करण्याची तयारी आहे. शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास पक्षशक्तीत नवा उत्साह निर्माण होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button