विकास झाला नाही म्हणता;आमच्या गावात ‘गुगल लोकेशन’ने यावे लागते!
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विरोधक बेंबीच्या देठापासून गेल्या दहा वर्षात विकास झाला नाही म्हणून बोंब मारत फिरत आहेत. त्यांना एकच सांगावे लागेल, 1997 मध्ये समाविष्ट झालेले डुडुळगाव गेल्या दहा वर्षात गुगल मॅपवर आले. परिसरात झालेल्या ‘डेव्हलपमेंट’ मुळे पै पाहुण्यांना गावात यायचे झाले तर गुगल लोकेशन लावून येतात. हीच आमच्या गावची गेल्या दहा वर्षात झालेली प्रगती आहे. दहा वर्षात आमच्या परिसराला विकासाच्या वाटेवर नेऊन ठेवणाऱ्या आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी ग्रामस्थ एकजुटीने उभे राहणार आहेत. गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेत यंदा दुप्पट ”लीड” डुडुळगाव गावातून मिळेल असे देखील ग्रामस्थांनी यावेळी निर्धार व्यक्त केला.
महायुतीचे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ डुडुळ गाव येथे ग्राम बैठक नुकतीच पार पडली. यावेळी डुडुळगाव तसेच परिसरातील अनेक ग्रामस्थ, वरिष्ठ नागरिक, युवक वर्ग उपस्थित होते. ग्रामस्थांनी विरोधकांचे यावेळी वाभाडे काढले.
ग्राम बैठकीत ग्रामस्थांनी विरोधकांना चांगलेच खडे बोल सुनावले. राजकारण करायचे म्हणून विरोधाला विरोध करू नका. ज्या गोष्टी झाल्या आहेत त्याला मान्य करायला शिका. 1997 मध्ये डुडुळगाव तसेच परिसरातील गावे समाविष्ट झाली. मात्र खऱ्या अर्थाने या गावांना न्याय देण्याचे काम आमदार महेश लांडगे यांनी केले. विकासाचे स्वप्न एका रात्रीत साकार होत नसते. हे विरोधकांनाही माहीत असावे. अनेक गोष्टी आमदार महेश लांडगे यांनी शून्यापासून पूर्ण केल्या आहेत. या गावातील रस्ते, आरक्षणे विकास आराखडा अशा सर्व बाबींवर आमदार महेश लांडगे यांनी काम केले. त्यामुळे या गावातील अनेक कामे दृष्टिक्षेपात आली आहेत .जी विरोधकांना मात्र दिसत नाही हे दुर्भाग्य आहे.
चांगले गृहप्रकल्प, कॉलेज परिसरात आले…
युवकांनी यावेळी आपली मते व्यक्त केली डुडुळगाव परिसरातील विविध विकास कामे, चांगले गृहप्रकल्प या भागातील कॉलेज पुणे शहरात जाण्यासाठी झालेले कनेक्टिंग रस्ते यामुळे डुडुळगाव गुगल मॅप वर आले. आमच्याच पाहुण्यांना गावात यायचे असेल, तर गुगल लोकेशन लावून यावे लागते एवढा बदल गेल्या दहा वर्षात या परिसरात झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये 1997 मध्ये समाविष्ट झालेल्या डुडुळगावामध्ये झालेला बदल स्पष्ट दिसत आहे. नागरिकांना चांगल्या मूलभूत सुविधा देणे हे आम्हा लोकप्रतिनिधींचे काम आहे. विरोधाला विरोध न करता शाश्वत विकास हे एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे. यापुढेही विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून शहराची प्रगती हेच उद्दिष्ट असणार आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, उमेदवार महायुती.